शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

अमावस्याची एक रात्र पोहाळे स्मशानभूमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 11:35 IST

Childrans kolhapur- एकविसाव्या शतकात विज्ञानयुगाच्या कितीही गप्पा मारल्या तरी भूतांखेतांच्या भीतीने अनेकांची गाळणं होती.स्मशानभूमी, पडकी घरे, निर्जन जागी अंधाऱ्यारात्री भूतांचा वावर असतो. यावरती अनेकांचा विश्वास आहे. अज्ञानातून निर्माण झालेली भूता-खेतांसह अंधश्रध्देची भीती मुलांच्या मनातून निघून जाण्यासाठी पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथे अंनिस गेल्या पाच वर्षापासून शोध भुतांचा हा उपक्रम राबवत आहे. मुलांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अंनिस गेले कित्येक वर्ष प्रयत्न करत आहे.

ठळक मुद्देअमावस्याची एक रात्र स्मशानभूमीतपोहाळे येथे स्मशान सहलीचे आयोजन

सरदार चौगुले/संजय कळके 

पोर्ले तर्फ ठाणे/पोहाळे तर्फ आळते : एकविसाव्या शतकात विज्ञानयुगाच्या कितीही गप्पा मारल्या तरी भूतांखेतांच्या भीतीने अनेकांची गाळणं होती.स्मशानभूमी, पडकी घरे, निर्जन जागी अंधाऱ्यारात्री भूतांचा वावर असतो. यावरती अनेकांचा विश्वास आहे. अज्ञानातून निर्माण झालेली भूता-खेतांसह अंधश्रध्देची भीती मुलांच्या मनातून निघून जाण्यासाठी पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथे अंनिस गेल्या पाच वर्षापासून शोध भुतांचा हा उपक्रम राबवत आहे. मुलांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अंनिस गेले कित्येक वर्ष प्रयत्न करत आहे.अमावस्या, पोर्णिमा किंवा काळोख्या रात्री अज्ञानपणातून मुलांच्या मानगुटीवर बसलेले अंधश्रध्देचे भूत बाहेर काढण्यासाठी कोल्हापूर चिल्लर पार्टी विध्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव आणि पन्हाळा तालुका अंनिस उपाध्यक्ष सर्पमित्र दिनकर चौगुले गेले कित्येक वर्ष प्रबोधनात्मक जनजागृती करत आहेत.हा उपक्रम शनिवारी अमावस्येच्या दिवशी सांयकाळी ७ वाजता सुरु झाला आणि  रात्री दिड पर्यंत चालला. अमावस्येच्या रात्री पोहाळे येथील स्मशानभूमीत भूताखेतांच्या गोष्टी ऐकवून दिनकर चौगुले यांनी विदयार्थ्याना मार्गदर्शन केले. 

शोध भुताचा, बोध मनाचा या उपक्रमामुळे मुलांना कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता गैरसमजूत्या आहारी गेलो तर भूतासारख्या अंधश्रद्धा आपल्या मनात पक्क्या होत जातात, हे शिकायला मिळाले. या उपक्रमासाठी पन्हाळा तालुका अंनिसचे कार्याध्यक्ष व नवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक, बालसाहित्यिक चंदकांत निकाडे यांचे सहकार्य झाले . 

या अनोख्या उपक्रमात चिल्लर पार्टी विध्यार्थी चित्रपट चळवळीचे कार्यकर्ते, शिवाजी मराठा हायस्कूल, कोल्हापूर, जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा नवनाथ हायस्कूल येथील ७० विदयार्थी व  ‍विदयार्थीनी तसेच सरपंच दादासाहेब तावडे, सामाजिक कार्यकर्ते बळीराम मिसाळ, श्रीकांत पाटील, प्रकाश ठाणेकर, दतात्रय पाटील आदी सहभागी झाले होते. 

मुलांची पाचावर धारण आणि अंधश्रध्देचे भूतस्मशानात झोपी जाण्याच्या स्थिती मुले असताना, स्मशानभूमीतून चाळ,घुंगरांचा आवाज कानावर पडत असताना एक स्त्री भींतीवर चालताना दिसली. सर्वजण भितीच्या छायेत असताना डोक्यावरचं झाड हालू लागले. सुमित नावाच्या मुलाने त्या चेटकीनीला फटकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती त्याच्या अंगावर धावून गेल्यावर हे दृष्य पाहणाऱ्या मुलांची पाचावर धारण बसली. काही न कळण्यापूर्वी सर्वजण घाबरून गाडीत जाऊन बसले. काही क्षणातच सर्वांना समजले की समोर आलेलं भूत नसून अंगाभोवती साडी नेसलेला पोहाळेचा सुनिल पाटील तरूण आहे. याची खात्री झाल्यावर सर्वांच्या जीवात जीव आला.

टॅग्स :children's dayबालदिनkolhapurकोल्हापूर