शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
4
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
5
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
6
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
7
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
8
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
9
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
10
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
11
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
12
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
13
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
14
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
15
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
16
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
17
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
18
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
19
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
20
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली

पुढच्या वर्षी भावाला आमच्या संघातून खेळवायचे

By admin | Updated: January 10, 2015 00:20 IST

शिवाजी तरुण मंडळाकडून खेळण्याची संधी मिळत नव्हती म्हणून नंदू तिवले यांनी स्थापन केलेल्या यंग बॉईज संघाकडून मी फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला

शिवाजी तरुण मंडळाकडून खेळण्याची संधी मिळत नव्हती म्हणून नंदू तिवले यांनी स्थापन केलेल्या यंग बॉईज संघाकडून मी फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला. माझा खेळ पाहून अरुण नरके, चंदू साळोखे यांनी माझे बंधू जयसिंग इंगवले यांना ‘अरे तुझा भाऊ पुढच्या वर्षी आमच्या संघातून खेळला पाहिजे. बाकी काय सांगायचे नाही.’ असा किस्सा शिवाजी तरुण मंडळाचे माजी फुटबॉलपटू आनंदराव इंगवले हे सांगत होते. शिवाजी तरुण मंडळाची तिरंगा रंगाची जर्सी घालावी, असे पेठेतील प्रत्येक फुटबॉल खेळाडूंना वाटत असणारा तो काळ होता. मी १९७५ मध्ये अकरावी नापास झालो. त्याच काळात मलाही शिवाजी तरुण मंडळाच्या ‘अ’ नाही, तर ‘ब ’संघातून खेळण्याची इच्छा होती. मात्र, आपल्याला संधी मिळणार नाही, असे गृहीत धरून मी नंदू तिवले यांच्या यंग बॉईज संघातून मी बचावफळी उत्तम सांभाळली. हा खेळ पाहण्यासाठी गांधी मैदानात चंदू साळोखे, अरुण नरके, आदी ज्येष्ठ मंडळी हजर होती. माझा खेळ पाहून त्यांनी थेट माझ्या भावालाच सुनावले. अरे हा ‘शिवाजी’च्या संघाकडून खेळताना तो चक्क यंग बॉईजकडून खेळतोय. त्याला पुढच्या वर्षी आपल्या ‘शिवाजी’कडून खेळव, असे सुनावले. यावेळी बंधू जयसिंग यांनी सांगितले की, आपल्याकडून त्याला संधी मिळणार नाही, असे वाटल्याने त्याने यंग बॉईजकडून खेळावयास प्रारंभ केला. पुढच्या वर्षी १९७६ ला मी शिवाजी तरुण मंडळाच्या ‘ब ’ संघ व ‘अ’ संघाकडून तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ खेळलो. या दरम्यान मी अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघाकडून खेळलो. भोपाळ विद्यापीठ विरोधात खेळताना तेथील उंचपुऱ्या खेळाडूंपुढे आमच्या विद्यापीठ संघातील खेळाडूंचा टिकाव लागला नाही. त्यामुळे आमच्यात कौशल्य असूनही १-० असा पराभव आम्हाला स्वीकारावा लागला. - शब्दांकन : सचिन भोसलेयांनी घडविलाकोल्हापूरचा फुटबॉल...