शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुढचा खासदार मंडलिकांच्या विचारांचाच : संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:15 IST

म्हाकवे : कागल तालुक्यासह जिल्ह्यातील मंडलिकप्रेमी कार्यकर्ते आपल्या हक्काचा प्रतिनिधी लोकसभेत पाठविण्यासाठी इच्छुक असून ते जोमाने कामालाही लागले आहेत. ...

ठळक मुद्देहमीदवाडा कारखान्यावर स्नेहफराळाचे आयोजन; कार्यकर्त्यांशी साधला संवाद

म्हाकवे : कागल तालुक्यासह जिल्ह्यातील मंडलिकप्रेमी कार्यकर्ते आपल्या हक्काचा प्रतिनिधी लोकसभेत पाठविण्यासाठी इच्छुक असून ते जोमाने कामालाही लागले आहेत. त्यामुळे आगामी खासदार हा मंडलिक गटाचा आणि त्यांच्या विचारांचाच होईल यामध्ये तीळमात्र शंका नाही, असा आत्मविश्वास जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.

सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्यावतीने कार्यस्थळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व संचालकांसह सभासद शेतकरी, ऊसतोड, मजूर व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे दिवाळीनिमित्त स्नेहफराळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडलिकांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर, वीरेंद्र मंडलिक, वैशाली मंडलिक, नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपसभापती विजय भोसले, विश्वासराव कुराडे, आनंदा मोरे, धनाजी बाचणकर, शिवाजीराव इंगळे, नंदकुमार घोरपडे, समरजित मंडलिक, आदी उपस्थित होते.दि. १४ रोजी गारगोटीत पुरस्कार वितरणदिवंगत सदाशिवराव मंडलिक ही सामान्य व्यक्ती नसून ती अखंडित विचारधाराच आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांची जपणूक करण्यासाठी त्यांच्या नावे स्मृती पुरस्कार विविध क्षेत्रांतील ख्यातनाम विभूतींचा सन्मान केला जातो. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा गारगोटी (ता.भुदरगड) येथे बुधवारी (दि.१४) होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही प्रा.मंडलिक यांनी केले.

...आता सभासद शेतकºयांनीच पुढाकार घ्यावाकोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यात साखर कारखान्याचे मोलाचे योगदान आहे. मात्र, सद्य:स्थितीत कारखानदारीच अडचणीत आहे. संघटना आपल्या निर्णयावर ठाम आहे तर शासन तोडग्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. ऊसतोडीसाठी आलेले मजूर व कारखान्याचे कर्मचारी बसून आहेत. त्यांची खोटी द्यावी लागणार आहे. त्यामुळे अशा वादात कारखानदारी मोडणार नाही याची दक्षता आता आपणच घेणे आवश्यक असल्याचे सांगत प्रा.मंडलिक यांनी थेट सभासदांनाच साद घातली.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर