शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मोकळी हवा, सुरक्षेचे ठेवा भान, अन्यथा गॅस गिझर ठरेल काळ; आजऱ्यातील नवदाम्पत्याच्या मृत्यूनंतर भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:54 IST

बंद बाथरूममध्ये धोका जास्त

कोल्हापूर : आजरा येथे सोमवारी सकाळी गॅस गिझरने गुदमरून नवदाम्पत्याचा मृत्यू झाला. अनेक लोक घरोघरी गॅस गिझर वापरतात. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. गॅस गिझरमुळे गुदमरून (सफोकशन) मृत्यू होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कार्बन मोनोऑक्साइड विषबाधा व ऑक्सिजनची कमतरता. हे अनेकदा बंद बाथरूममध्ये किंवा अयोग्य वायुविजन असलेल्या जागांमध्ये घडते.बाजारात सरासरी साडेपाच ते दहा हजारांपर्यंत चांगल्या कंपन्यांचे गॅस गिझर उपलब्ध आहेत. सरासरी गॅसच्या एका टाकीपासून आठ हजार लिटर पाणी तापते. गॅस गिझर वापरायला सुरक्षितच असतो; परंतु लोक त्यांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. पाइपमधून गॅस जात असतो किंवा रेग्युलेटरपासूनही गळती असते तेव्हा लोक त्याच्याकडे पाहत नाहीत. त्यातून दुर्घटना घडत असल्याचे येथील गॅस गिझरचे वितरक तानाजी पोवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

वाचा - गॅस गिझरच्या गळतीमुळे नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू, पोलिस तपास सुरु

गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू कसा होतो?

  • गिझरमध्ये जेव्हा गॅस जळतो. जर जळणं पूर्ण नसलं, तर कार्बन मोनोऑक्साइड तयार होतो. हा गॅस गंधहीन, रंगहीन आणि अत्यंत विषारी असतो.
  • शरीरातील रक्तातली ऑक्सिजनची जागा कार्बनडाय ऑक्साइड घेतो आणि मग मेंदू व इतर अवयवांमध्ये ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे व्यक्तीला चक्कर येते, श्वास घ्यायला त्रास होतो, बेशुद्ध पडतो आणि नंतर मृत्यू होतो.

खर्च वाचवण्यासाठी..ज्यांची घरी गॅस गिझर आहे, त्यांनी तो मोकळ्या हवेत ठेवायला हवा. गॅसटाकीही मोकळ्या हवेतच ठेवण्याची गरज असते; परंतु तेथून कनेक्शन बाथरूममध्ये आणण्यासाठी प्लम्बिंगचा खर्च येतो तो वाचवण्यासाठी लोक बाथरूममध्येच ही व्यवस्था करतात. ती काहीवेळा जीवघेणी ठरू शकते.

लक्षणे (मृत्यू होण्याआधी) :• डोकेदुखी• चक्कर येणे• मळमळ/उलटी• थकवा आणि अशक्तपणा• श्वास घेण्यास अडचण• बेशुद्ध पडणे

बचावासाठी उपाय :

  • बाथरूममध्ये चांगलं वायुविजन असावं.
  • गिझर शक्यतो बाथरूमच्या बाहेर लावावा.
  • दरवर्षी गिझरची सर्व्हिसिंग करून घ्यावी.
  • कार्बन मोनोऑक्साईड डिटेक्टर लावावा.
  • गिझर चालू असताना खूप वेळ बाथरूममध्ये राहू नये.

आपत्कालीन परिस्थितीत हे करा..

  • व्यक्ती बेशुद्ध आढळल्यास ताबडतोब बाथरूमचे दरवाजे, खिडक्या उघडा
  • गॅस बंद करा
  • व्यक्तीला बाहेर मोकळ्या हवेत आणा
  • त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करा.