शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नुतन मंत्र्यांचे कोल्हापुरात ग्रॅण्ड वेलकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 16:29 IST

कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सतेज पाटील व राजेंद्र पाटील या राज्यमंत्र्याचे कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे ग्रॅण्ड वेलकम झाले. हलगी, संबळ, धनगरी ढोलांच्या निनादात कागदी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या दणदणाटातच या तीन मंत्र्यांनी कोल्हापुरकरांच्या स्वागताचा स्विकार झाला. फुलांनी सजवलेल्या ओपन टप ट्रकमधून कावळा नाका ते दसरा चौक या मार्गावर निघालेल्या रॅलीत कार्यकर्त्यांनी केलेल्या जंगी स्वागतानेही मंत्रीही भारावले.

ठळक मुद्देनुतन मंत्र्यांचे कोल्हापुरात ग्रॅण्ड वेलकमहलगी, संबळ, धनगरी ढोलांच्या निनादात कागदी पुष्पवृष्टी

कोल्हापूर: कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सतेज पाटील व राजेंद्र पाटील या राज्यमंत्र्याचे कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे ग्रॅण्ड वेलकम झाले. हलगी, संबळ, धनगरी ढोलांच्या निनादात कागदी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या दणदणाटातच या तीन मंत्र्यांनी कोल्हापुरकरांच्या स्वागताचा स्विकार झाला. फुलांनी सजवलेल्या ओपन टप ट्रकमधून कावळा नाका ते दसरा चौक या मार्गावर निघालेल्या रॅलीत कार्यकर्त्यांनी केलेल्या जंगी स्वागतानेही मंत्रीही भारावले.मंत्री झाल्यानंतर शुक्रवारी हे तिघेही कोल्हापुरात पहिल्यांदाच आले. साहजिकच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. कावळा नाका येथे अकरा वाजता या तीनही मंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांनी उचलूनच फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये बसवले. पुढे मागे कार्यकर्त्याचा जथ्था, गाड्यांचा ताफा आणि त्याच्या मधोमध सजवलेली दोन वाहने असा ताफा कावळा नाक्यापासून दसरा चौकाकडे मार्गस्थ झाला. पहिल्या गाडीत नुतन मंत्री, खासदार संजय मंडलीक, महापौर सुरमंजिरी लाटकर, आमदार ऋतूराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, नुतन जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतिश पाटील, आर.के.पोवार, ए.वाय.पाटील, संजय डी.पाटील, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, नविद मुश्रीफ, आदिल फरास यांच्यासह वरिष्ठ नेते होते तर त्यांच्या मागील गाडीत प्रतिमा सतेज पाटील यांच्यासह महिला नेत्या होत्या.कावळा नाका येथे ताराराणी पुतळा, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील राजीव गांधी पुतळा, व्हीनस कॉर्नरला राजाराम महाराज पुतळा असे अभिवादन केल्यानंतर दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीची सांगता झाली. येथे सभा झाल्यानंतर या तीनही मंत्र्यांनी बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर व महात्मा फुले यांचा पुतळा व शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मंदीरात जाऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.----------------------------------------------------------------------(नसिम)

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूर