शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

नवीन प्रजातीच्या रंगीत पालीला संशोधकाच्या वडिलांचे नाव, तामिळनाडूत घनदाट जंगलात आढळली पाल 

By संदीप आडनाईक | Updated: November 7, 2023 15:48 IST

कोल्हापूर : वन्यजीव संशोधकांना एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. तामिळनाडूतील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाममधील उंच डोंगररांगांमधील घनदाट ...

कोल्हापूर : वन्यजीव संशोधकांना एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. तामिळनाडूतील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाममधील उंच डोंगररांगांमधील घनदाट जंगलात ही पाल आढळून आली. पालींच्या विविध जातींचा अभ्यास करणारे सातारचे संशोधक अमित सैय्यद यांनी या पालीला आपल्या वडिलांचे प्रो. रशिद सैय्यद यांचे नाव दिले आहे. या पालीला आता ‘निमास्पिस रशिदी’ या नावाने ओळखले जाईल.अमित सैय्यद आणि त्यांच्या टीमचे दोन सहकारी समुद्रसपाटीपासून १२४५ मीटर उंच असणाऱ्या तामिळनाडूच्या डोंगरभागातील घनदाट जंगलात २०१३ पासून पालींवर संशोधनाचे काम करत आहेत. हे जंगल हे लहान, मोठ्या विविध हिंस्र प्राण्यांनी भरलेले आहे. ज्या भागात त्यांची शोधमोहीम सुरू होती, तेथे पाण्याची, खाण्याची, राहायची साेय नाही. तिथे मोबाइलला कोणतेच नेटवर्क मिळत नाही. पाऊस आला की झाडाखाली थांबायचे, भूक लागल्यावर सोबत नेलेल्या जेवणाच्या साहित्यावर गुजराण करावी लागे.

वाघ, अस्वल आणि जंगली हत्तीसारख्या प्राण्यांच्या अधिवासात त्यांनी काम केले. अमित यांच्या परिश्रमाला २०१५ मध्ये अखेर यश आले आणि या नव्या रंगीत पालीचा शोध लागला. या पालीवर प्रयोगशाळेत संशोधन करून त्याच्या सर्व अवयवांचा, त्याच्यावर असणाऱ्या खवल्यांचा तसेच जनुकीय अभ्यास अमित यांनी पूर्ण केला. शास्त्रीय अभ्यासातून ही पाल नवीन असून, वन्यजीवशास्त्रात याची अद्यापी नोंदच झाले नसल्याचा दाखला मिळाला.

आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत माहिती प्रसिद्ध

अमित सैय्यद यांनी या पालीला त्यांचे वडील प्रो. रशिद सैय्यद यांचे नाव दिले. त्यामुळे या पालीला ‘निमास्पिस रशिदी’ या नावाने आता ओळखले जाईल. ‘एशियन जर्नल ऑफ कंजर्वेशन बायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संशोधनपत्रिकेत रविवारी या पालीची माहिती प्रसिद्ध झाली.विविध रंगछटांची पाल‘निमास्पिस रशिदी’ ही पाल त्याच्यावर असणाऱ्या पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या रंगछटांमुळे अतिशय सुंदर दिसते. या संशोधनासाठी अमित सैय्यद यांच्यासह सॅमसन किरूबाकरण, राहुल खोत, थानीगैवल ए, सतीशकुमार, अयान सय्यद, मासूम सय्यद, जयदीत्या पूरकायास्ता, शुभंकर देशपांडे आणि शवरी सुलाखे यांनीही भाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरResearchसंशोधन