कुरुंदवाड : येथील राष्ट्रसेवा दलाच्यावतीने आयोजीत प्रो-कबड्डी स्पर्धेत न्यू प्रभू लिंगेश्वर तारदाळ आणि शिवशाहू सडोली संघांनी शुक्रवारी विजयी सलामी दिली. आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते व दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रो-कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी ५० किलो वजनी गटात शिरोळच्या बाल शिवाजी संघाने १७-१६ गुणांनी तळसंदेच्या राष्ट्रसेवक संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. शुक्रवारी न्यू प्रभू लिंगेश्वर, तारदाळ संघाने बाल शिवाजी, शिरोळ संघावर सुरुवातीपासून वर्चस्व राखत उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत पूर्वार्धात २७-१६ अशी आघाडी घेतली. पूर्वार्धातील आघाडीच्या जोरावर प्रभू लिंगेश्वर संघाने ५०-३६ अशा फरकाने सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात कर्ण स्पोर्टस्ने सोलापूर संघावर शिवशाहू, सडोली संघाने ५२-३४ अशा फरकाने पराभव करीत विजयी सलामी दिली. तत्पूर्वी ५० किलो वजनी गटातील उपांत्य फे रीत अटीतटीच्या सामन्यात तळसंदेच्या राष्ट्रसेवक संघाने कासेगावच्या समीधा संघावर २३-२२ अशा फरक ाने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात शिरोळच्या बाल शिवाजी संघाने राष्ट्रसेवा कुरुंदवाड संघावर २९-३७ अशी मात क रत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम अटीतटीच्या सामन्यात शिरोळच्या बाल शिवाजी संघाने तळसंदेच्या राष्ट्रसेवक संघावर एका गुणांनी मात करत निसटता विजय मिळवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. रात्री उशिरापर्यंत प्रो-कबड्डीचे सामने सुरू होते.
न्यू प्रभूलिंगेश्वर, शिवशाहूची विजयी सलामी
By admin | Updated: February 13, 2015 23:41 IST