शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

corona cases in kolhapur : नवे रुग्ण कमी, कोरोनामुक्त जास्त, १४६१ पॉझिटिव्ह, २५६७ डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 11:21 IST

corona cases in kolhapur :  कोल्हापूर जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र शनिवारी स्पष्ट झाले. नवे १४६१ रुग्ण आढळले असून, २५६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देनवे रुग्ण कमी, कोरोनामुक्त जास्त१४६१ पॉझिटिव्ह, २५६७ डिस्चार्ज, ३२ मृत्यू

 कोल्हापूरजिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र शनिवारी स्पष्ट झाले. नवे १४६१ रुग्ण आढळले असून, २५६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असल्याचे चित्र गेले दोन दिवस दिसत असून, मृतांचा आकडाही कमी होत आहे. गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांपेक्षा ११०६ जादा नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. कोल्हापूर शहरात ३२२, करवीर तालुक्यात २६६, तर हातकणंगले तालुक्यात २३२ नवे रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरातील मृतांची संख्या वाढली असून, ती ११ झाली आहे. हातकणंगले तालुक्यात पाच, तर इचलकरंजीतील चौघांचा मृत्यू झाला आहे.शहरातील मृतांचा आकडा वाढला

  • कोल्हापूर ११

यादवनगर, जुना बुधवार पेठ, शिवाजी पेठ, फुलेवाडी, मंगळवार पेठ २, राजारामपुरी, नवा वाशीनाका, राजकपूर पुतळा, कसबा बावडा, नागाळा पार्क

  • हातकणंगले ०५

रुई, हुपरी, चंदूर, रुकडी, सावर्डे

  • इचलकरंजी ०४

लालानगर, शहापूर, मलाबादेनगर, इंदिरा कॉलनी

  • शाहूवाडी ०२

सुपात्रे, खोतवाडी

  • गडहिंग्लज ०२

हसूरचंपू, गडहिंग्लज

  • करवीर ०२

प्रयाग चिखली, कळंबा

  • पन्हाळा ०१

आळवे

  • शिरोळ ०१

अब्दुललाट

  • कागल ०१

बेनिक्रे

  • इतर ०३

आष्टा, कणकवली, देवगड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर