शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

कोल्हापूरच्या चित्रपटसंस्कृतीचे नवे दालन

By admin | Updated: September 26, 2016 00:08 IST

‘कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी’ : जागतिक सिनेमाची कवाडे खुली

  इंदूमती गणेश ल्ल कोल्हापूर कोल्हापूर म्हणजे चित्रपटसृष्टीची गंगोत्री. या मातीत ही कला रुजली आणि कोल्हापूरकरांनी ती अखंड जोपासली. आता मुंबई हे चित्रपटसृष्टीचे केंद्र असले तरी या क्षेत्राला कोल्हापूरने दिलेले योगदान सुवर्णाक्षरांत लिहिले गेले आहे. या परंपरेची जपणूक करीत रसिकांना चित्रपटसाक्षर बनविण्याचे काम कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीने केले आहे. किफच्या निमित्ताने फिल्म सोसायटीने रसिकांसाठी जागतिक सिनेमाची कवाडे खुली आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांचे नाव घेतले जाते. मात्र त्यानंतर ज्यांनी या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले, ते म्हणजे कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी. भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा बनविण्यापासून ते पोस्टर पेंटिंग, महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून सामाजिक आशयपूर्ण चित्रपटांची निर्मिती करण्यापर्यंतचे त्यांचे कार्य आजही प्रेरणा देते. त्यांनी त्या काळी जगभरातील चित्रपट रसिकांना आपले चित्रपट दाखविले. मा. विनायक, मा. विठ्ठल, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम अशा कितीतरी दिग्गजांनी कोल्हापूरचे नाव चित्रपटसृष्टीत सुवर्णाक्षरांत लिहिले. मात्र हे वैभव आता इतिहासजमा झाले आहे. दादासाहेब फाळके यांच्यानंतर खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीचे नवअंकुर फुलविणाऱ्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या स्मृती कायम ठेवत २००२ साली कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीची स्थापना करण्यात आली. चित्रपटसृष्टीत कोल्हापूरने दिलेले योगदान अतुलनीय असले तरी तो आता इतिहास झाला आहे. एकेकाळी चित्रपटनिर्मितीचे प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापुरात आजची स्थिती मात्र समाधानकारक नाही. सगळ्या आशा कोल्हापूरच्या चित्रनगरीकडे एकवटलेल्या आहेत. अशा निराशाजनक परिस्थितीत कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीने आपले काम सुरू केले. स्वातंत्र्यपूर्वकाळात चित्रपट हे देशप्रेम जागृत करणारे आणि स्वातंत्र्यानंतर समाजप्रबोधनाचे माध्यम ठरले. १९७० नंतर चित्रपट हे सर्जनशील नवनिर्मितीचे माध्यम आहे, असा नवीन विचार देणारे लेखक-दिग्दर्शक तयार झाले. फिल्म इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी समांतर चित्रपट चळवळ सुरू केली. फिल्म सोसायटीने प्रयोगशील दिग्दर्शक दिले. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी याच कोल्हापूरच्या मातीत पुन्हा एकदा चित्रपट चळवळ रुजविण्यासाठी व नवे कलाकार घडविण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे सभासदांना दर महिन्याला जागतिक पातळीवरील कमीत कमी दोन चित्रपट दाखविले जातात. याशिवाय विविध कलावंतांच्या जयंतीचे औचित्य साधून छोट्या-मोठ्या महोत्सवांचे आयोजन केले जाते. तसेच किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संयोजनातही फिल्म सोसायटी मोलाचे योगदान देते. फिल्म फेडरेशनचा इतिहास भारतात १९५२ साली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. सत्यजित रे यांनी १९५० साली फिल्म क्लबची स्थापना केली. चित्रपटाची ही चळवळ देशभर सुरू झाली. ४०० फिल्म सोसायट्यांची स्थापना झाली. महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये एकूण ४० फिल्म सोसायटी आहेत. श्याम बेनेगल हे फिल्म फेडरेशनचे अध्यक्ष असताना त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये फिल्म क्लबची स्थापना व्हावी, असे आवाहन केले होते. त्याकाळी कोल्हापुरात साक्षी, टीएफटी, अभिरुची, युगांतर अशा फिल्म सोसायट्या काम करीत होत्या. या सोसायट्या हेच मनोरंजनाचे मुख्य माध्यम होते. मात्र ‘दूरदर्शन’ची सुरुवात झाल्यानंतर फिल्म चळवळ थंडावली. ठरावीक कालावधीनंतर दूरदर्शनची भुरळ कमी झाली आणि पुन्हा लोक फिल्म सोसायटीकडे वळले. संचालक मंडळ अध्यक्ष : चंद्रकांत जोशी, सचिव : दिलीप बापट, कोषाध्यक्ष : भूषण खेबुडकर सभासद : चंद्रकांत कारेकर, बाळासाहेब ताटे, सज्जन लोहार, सचिन जिल्हेदार, मनीष राजगोळकर, मयूर कुलकर्णी, तेजस्विनी कागलकर, सुभाष भुर्के. ‘किफ’- कोल्हापूरची नवी ओळख कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीने २००९ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला. या चित्रपटाच्या चळवळीला तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रोत्साहन दिले होते. हा पहिलाच चित्रपट महोत्सव खूप गाजला. त्याचवर्षी ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल’ या नावाने महोत्सव कोल्हापुरात घेण्यात आला होता. सलग तीन वर्षे हा चित्रपट महोत्सव ‘थर्ड आय’ या नावानेच घेण्यात आला. २०१२ हे भारतीय सिनेमाचे शताब्दी वर्ष होते. त्याचे औचित्य साधून या चित्रपट महोत्सवाचे नाव ‘थर्ड आय’ बदलून ‘कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ (किफ) असे करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून ‘किफ’ नावाने हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोल्हापुरात आयोजित केला जातो. यंदा डिसेंबरमध्ये पाचवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. या ‘किफ’मुळे कोल्हापूरची नवी ओळख कोल्हापुरबाहेरही निर्माण झाली. महोत्सवात जगभरातील देशविदेशांतील ४० ते ५० चित्रपट दाखविले जातात. ‘किफ’मध्ये ‘पॅनोरामा’ या विभागात गाजलेले चित्रपट दाखविले जातात. कंट्री फोकसमध्ये विविध देशांतील समाज, संस्कृती, भाषा, जीवनशैली यांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. हा महोत्सव आता जागतिक नकाशावर आपले नाव निश्चित करू लागला आहे.