शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘नेताजी’ची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अतिशय थरारक आणि अटीतटीच्या वातावरणात चौथ्या फेरीत गडहिंग्लजच्या नेताजी पालकर गोविंदा पथकाने धनंजय महाडिक युवा शक्तीच्या तीन लाखांच्या दहीहंडीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. खचाखच भरलेल्या दसरा चौकातील हजारो रसिकांना साक्षी ठेवत ‘नेताजी’चा गोविंदा प्रकाश मोरे याने बुधवारी रात्री१० वाजता दहीहंडी फोडत पाच तासांची रसिकांची प्रतीक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अतिशय थरारक आणि अटीतटीच्या वातावरणात चौथ्या फेरीत गडहिंग्लजच्या नेताजी पालकर गोविंदा पथकाने धनंजय महाडिक युवा शक्तीच्या तीन लाखांच्या दहीहंडीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. खचाखच भरलेल्या दसरा चौकातील हजारो रसिकांना साक्षी ठेवत ‘नेताजी’चा गोविंदा प्रकाश मोरे याने बुधवारी रात्री१० वाजता दहीहंडी फोडत पाच तासांची रसिकांची प्रतीक्षा संपवली.‘पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी’ असा नावलौकिक मिळविलेल्या ‘युवा शक्ती’च्या या दहीहंडीसाठी दुपारी चारनंतर युवावर्ग मोठ्या संख्येने दसरा चौकात जमा होऊ लागला. ४९ फुटांवर सुरुवातीला दहीहंडी बांधण्यात आली होती. मात्र, तीन फेºया झाल्या, सात थर लावले तरीही दहीहंडी फोडण्यात यश येत नसल्याने अखेर रात्री साडेनऊनंतर ३६ फुटांवर दहीहंडी बांधण्याचा निर्णय घेतला. चौथ्या फेरीत शिरोळच्या जय हनुमान गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याची संधी मिळाली. त्यांनी अतिशय उत्तम प्रयत्न केला. मात्र, सहावा थर लावताना त्यांचा मनोरा कोसळला आणि मिळालेल्या संधीचा फायदा उठवत ‘नेताजी’ने बाजी मारली.श्रीमंत ढोल-ताशा पथकाने दिलेली दणकेबाज सलामी, साथर्क क्रिएशन्सच्या कलाकारांचे दिलखेचक नृत्य आणि डीजेचा ठेक्यावर नाचणारी तरुणाई अशा जल्लोषी वातावरणात सायंकाळी सात वाजता शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते दहीहंडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, उल्हास पाटील, संध्यादेवी कुपेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, अरुंधती महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.जय हनुमान गोविंद पथक (शिरोळ), नृसिंह (कुटवाड), संघर्ष (गडहिंग्लज), अजिंक्यतारा (शिरोळ), नेताजी पालकर यांच्यात अंतिम लढतीसाठी संघर्ष सुरू झाला. मात्र नेताजी पालकरने मिळालेली संधी न गमावता शिस्तबद्धपणे मनोरा रचत सात थर लावून दहीहंडी फोडत दुसºयांदा विजेतपद पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी तीन लाखांचा धनादेश या पथकाला प्रदान करण्यात आला. माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे नूतन अध्यक्ष महेश जाधव, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, धैर्यशील देसाई, रामराजे कुपेकर, भगवान काटे, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, सुहास लटोरे, उद्योगपती मिलिंद धोंड, समीर शेठ यांच्यासह विविध थरांतील मान्यवर उपस्थित होते.यावेळी कर्णबधीर आणि पॅराआॅलिम्पिकमध्ये यश मिळविलेल्या सुबिया मुल्लाणी, अमित सुतार, केदार देसाई, प्राजक्ता पाटील, ओंकार राणे, अविष्कार सावेकर तसेच संतोष मिठारी यांचा सत्कार करण्यात आला. विजय टिपुगडे, सागर बगाडे, अनंत यादव, राजेंद्र बनछोडे, उत्तम पाटील, विनायक सुतार, इंद्रजित जाधव, संगाप्पा शिवपुलजी यांनी पंच म्हणून काम पाहिले. सत्यजित कोसंबी यांनी सूत्रसंचालन केले.