शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

नेपाळचे कबड्डी संघ शिवाजी विद्यापीठात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:58 IST

काठमांडू येथे या वर्षीची दक्षिण आशियाई स्पर्धा होणार आहे. त्यात सहभागी होणारे नेपाळच्या मुला-मुलींचे कबड्डी संघ सरावासाठी  शिवाजी विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठ आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतील संघांसमवेत नेपाळचे संघ सराव करणार आहेत, प्रशिक्षण घेणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांनी  दिली.

कोल्हापूर : काठमांडू येथे या वर्षीची दक्षिण आशियाई स्पर्धा होणार आहे. त्यात सहभागी होणारे नेपाळच्या मुला-मुलींचे कबड्डी संघ सरावासाठी  शिवाजी विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठ आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतील संघांसमवेत नेपाळचे संघ सराव करणार आहेत, प्रशिक्षण घेणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांनी  दिली.दक्षिण आशियाई स्पर्धा दि. १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कबड्डीतील नवतंत्रज्ञान, कौशल्यांचे प्रशिक्षण घेण्यासह सराव आणि तयारी करण्याकरिता नेपाळमधील मुले आणि मुलींचा संघ शिवाजी विद्यापीठात आला आहे. मुलांच्या संघात १६, तर मुलींच्या संघामध्ये १४ खेळाडूंचा समावेश आहे.

हे खेळाडू १८ ते २७ वयोगटातील आहेत. या संघांचा रोज सकाळी सराव घेतला जाईल. त्यांना कबड्डीतील नवतंत्रज्ञान, कौशल्यांची माहिती दिली जाईल. त्यांना माझ्यासह उमा भोसले-भेंडीगिरी, ओंकार पायगुडे, सागर खटाळे, आदी मार्गदर्शन करतील. खेळातील गती आणि क्षमता वाढविण्याबाबत सुहास सोळंकी मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारनंतर या संघांचे सराव सामने घेण्यात येतील. विद्यापीठासह शाहू कॉलेज, इस्लामपूर येथील कन्या महाविद्यालय, आदींसमवेत सामने होतील. नेपाळमधील दोन्ही संघ मंगळवारी दुपारी विद्यापीठात दाखल झाले आहेत. विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडासंकुलात प्रशिक्षण सुरू झाले. दि. २१ नोव्हेंबरला हे संघ मुंबईला रवाना होतील, असे प्रशिक्षक भेंडीगिरी यांनी सांगितले.संघांना वेगळा अनुभव, ज्ञानयापूर्वी तीन वेळा थायलंडचा कबड्डी संघ सरावासाठी शिवाजी विद्यापीठात आला होता. येथील सरावाचा या संघांना चांगला उपयोग झाला. अन्य देशांतील संघ विद्यापीठात सरावासाठी आल्याने दोन्ही देशांतील संघांमध्ये एकमेकांचे ज्ञान, खेळातील तंत्र, कौशल्यांबाबतच्या माहितीचे आदानप्रदान होते आणि अनुभव मिळतो, असे प्रशिक्षक भेंडीगिरी यांनी सांगितले.

संघांची भक्कम तयारी करण्याच्या उद्देशाने आम्ही विविध ठिकाणच्या संघांसमवेत सराव करीत आहोत. त्याअंतर्गत शिवाजी विद्यापीठात आलो आहोत. याठिकाणी नवीन कौशल्य, ज्ञान आमच्या खेळाडूंना निश्चितपणे मिळेल.- कृष्णदेव पानता, संघव्यवस्थापक, नेपाळ.

 

 

 

 

टॅग्स :Kabaddiकबड्डीShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरNepalनेपाळ