शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नळजोडणीधारकांना नाहक भुर्दंड

By admin | Updated: May 27, 2016 00:03 IST

बिलांत तिपटीने वाढ : वाढत्या तक्रारींमुळे मीटर रीडर वैतागले; पाणीवापराच्या तिसऱ्या टप्प्यामुळे बिले भरमसाट

तानाजी पोवार -- कोल्हापूर : पाणी बिलात अपहार होऊ नये म्हणून ‘स्पॉट बिलिंग’ची अत्याधुनिक आॅनलाईन यंत्रणा महानगरपालिकेच्या वतीने कार्यरत केली असली तरी ग्राहकांना चार महिने उशिरा बिले हाती मिळत असल्यामुळे नियमानुसार बिलिंगमधील पाणीवापराचा टप्पा वाढून त्याचा नाहक भुर्दंड नळजोडणीधारकावर पडत आहे. चार महिन्यांनी पण अडीच ते तिप्पट वाढीची पाण्याची बिले हाती पडल्यानंतर नळजोडणीधारक चक्रावून जात आहेत; त्यामुळे तक्रारींत भर पडत आहे.शहरातील पाण्याची स्पॉट बिलिंगची योजना ५ मार्चपासून सुरू झाली. ती सुरू झाल्यापासून तक्रारी कमी होण्याऐवजी त्यांत भरच पडत आहे. स्पॉट बिलिंग उपक्रमात बिल जाग्यावरच ग्राहकांना देण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेता, मीटर रीडरची संख्या वाढविणे क्रमप्राप्त आहे. शिवाय तांत्रिक बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा पाणी बिल वसुलीवर परिणाम होणार आहे.नळजोडणीधारकांच्या हाती चार महिन्यांनी ‘स्पॉट बिल’ मिळत असल्यामुळे २० हजार लिटर पाणीवापरापर्यंत १९० रुपये कमीत-कमी आकारणी, त्यापुढील २० हजार ते ४० हजार लिटरपर्यंत पाणी वापरासाठी ११.५० रुपये प्रतिहजारी असा दर पडतो. त्यामुळे सामान्य कुटुंबाचे दोन महिन्यांचे बिल जास्तीत जास्त ३५० रुपये येत होते. चार महिन्यांचे जास्तीत जास्त ७०० रुपये अपेक्षित असताना हेच बिल १४०० ते १६०० रुपये आल्यामुळे ग्राहक चक्रावून जात आहेत. विशेष म्हणजे, बिले देण्यास लागलेल्या विलंबामुळे चार महिन्यांचा पाणीवापर घेण्यात येतो त्यावेळी पाणीवापराच्या तिसऱ्या टप्प्याचा (४० हजार लिटर पाणीवापर पुढे) प्रतिहजारी १५ रुपये प्रतिहजारी दर लागू होतो. त्यामुळे पाण्याच्या बिलात सुमारे अडीच ते तिप्पट वाढ होत आहे. (समाप्त)बंद मीटरचा महापालिकेला तोटामीटर बंद असताना पहिल्या महिन्यातच नळजोडणीधारकाला १३२० रुपयांचा आकार आकारला जातो. त्यानंतरही मीटर दुरुस्त न केल्यास दर दोन महिन्यांनी या दंडाच्या रकमेत वाढ होते; पण स्पॉट बिलिंगमध्ये बंद मीटरसाठी १९० रुपयेच प्रथम आकार आकारला जातो. त्यानंतरही मीटर दुरुस्त न केल्यास दर दोन महिन्यांनी ५२०, ६५०, १०४० रु. असा दंडात्मक आकार वाढत जातो. किमान हजार रुपये बिल येत असेल तर स्पॉट बिलिंगमध्ये मीटर बंद दाखविल्यास त्याचे बिल अवघे १९० रुपये येते. त्यामुळे महानगरपालिकेला जादा रकमेचा तोटा सहन करावा लागत आहे. तक्रार करूनही प्रशासनाने त्याची गंभीरपणे दखल घेतलेली नाही.