शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतरच्या मुलांच्या भावजीवनावर लेखन होणे गरजेचे : किरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 18:04 IST

literature Online Kolhapur : कोरोनानंतरचे मुलांचे भावजीवन यावर आज लेखन होणे गरजेचे आहे. ज्या साहित्यामध्ये बालसाहित्य असतं त्यामध्ये वाचणारी पिढी घडते. बालसाहित्य म्हणजे नुसतं फुल नाही तर त्या फुलाचा सुगंध आहे. नुसता समुद्र नाही तर समुद्राच्या लाटा देखील आहेत, ज्याला सुगंध घेता येतो, लाटा झेलता येतात असा माणूस चांगली बालसाहित्याची निर्मिती करू शकतो, असे मत 'किशोर' या मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकोरोनानंतरच्या मुलांच्या भावजीवनावर लेखन होणे गरजेचे : किरण केंद्रेआभासी बालसाहित्य व्याख्यानमाला : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे आयोजन

कोल्हापूर : कोरोनानंतरचे मुलांचे भावजीवन यावर आज लेखन होणे गरजेचे आहे. ज्या साहित्यामध्ये बालसाहित्य असतं त्यामध्ये वाचणारी पिढी घडते. बालसाहित्य म्हणजे नुसतं फुल नाही तर त्या फुलाचा सुगंध आहे. नुसता समुद्र नाही तर समुद्राच्या लाटा देखील आहेत, ज्याला सुगंध घेता येतो, लाटा झेलता येतात असा माणूस चांगली बालसाहित्याची निर्मिती करू शकतो, असे मत 'किशोर' या मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी व्यक्त केले.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी व्याख्यानमालेत ते बोलत होते. या 'बालसाहित्य व्याख्यानमाले 'अंतर्गत केंद्रे यांनी 'बालसाहित्यिकाकडून अपेक्षा 'या विषयावर आपले मत व्यक्त केले. या आभासी व्याख्यानमालेचे संयोजन गोविंद पाटील, वि. द. कदम, प्रा. विनोद कांबळे यांनी केले.बालसाहित्य हे बालमनाला अलगद स्पर्शून जाणारं असावं असे सांगून किरण केंद्रे म्हणाले, हलक्याफुलक्या शब्दकळांनी संस्कार संपन्न करणार असं साहित्य येणे गरजेचे आहे. बालसाहित्य आणि चित्र यांची सांगड घालण्याचं काम मुलं करत आहेत. बालसाहित्य हे सहजतेने घेणारी गोष्ट नाही. सोपं लिहिणं सर्वात कठीण असतं हे बालसाहित्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. साहित्याचा उद्देशात माहिती, मूल्यं आणि शहाणपण हे आहे. बालसाहित्यामधून यातला नेमका उद्देश मुलांना व्यापक दृष्टिकोनातून सांगण्याची गरज आहे.मराठी बालसाहित्याची उपेक्षामहाराष्ट्रामध्ये मराठी बालसाहित्याची उपेक्षा झालेली दिसते. या साहित्याकडे जितक्या गंभीरतेने मराठी साहित्याने बघायला पाहिजे होतं तितकं बघितलं नाही. जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत बालसाहित्यामध्ये नाविन्यपूर्ण लेखन येणार नाही. 'किशोर' मासिकाचे काम करत असताना रोज अनेक प्रकारचे साहित्य येतं. मात्र यातलं नेमकं बालसाहित्य आम्ही प्रसिद्ध करीत असतो, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूरonlineऑनलाइन