शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

नव्या नियमांऐवजी पदभरतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:03 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या पातळीवरील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या नियुक्तीसाठीच्या पात्रतेबाबत नव्या नियमांऐवजी रिक्त पदे भरण्याची गरज आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी)नियुक्तीसाठी महाविद्यालय, विद्यापीठ असे दोन स्तर करण्याची आवश्यकता नव्हती; त्यामुळे आता कुठे गती घेत असलेल्या महाविद्यालयीन पातळीवरील संशोधनाला बगल मिळणार असल्याची प्रतिक्रिया उच्च शिक्षण ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या पातळीवरील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या नियुक्तीसाठीच्या पात्रतेबाबत नव्या नियमांऐवजी रिक्त पदे भरण्याची गरज आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी)नियुक्तीसाठी महाविद्यालय, विद्यापीठ असे दोन स्तर करण्याची आवश्यकता नव्हती; त्यामुळे आता कुठे गती घेत असलेल्या महाविद्यालयीन पातळीवरील संशोधनाला बगल मिळणार असल्याची प्रतिक्रिया उच्च शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.उच्च शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवरील प्राध्यापकांच्या नियुक्ती, पदोन्नतीसाठीच्या किमान पात्रतेसाठीचे नवे नियम ‘यूजीएसी’ने गेल्या चार दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यात विद्यापीठातील सहायक प्राध्यापक या किमान श्रेणीमधील पदावरील नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्णतेसह पीएच.डी. पदवी असणे बंधनकारक केले. महाविद्यालयांतील थेट नियुक्तीकरिता पीएच.डी. अथवा नेट परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट ठेवली.नियुक्तीसाठीचे नवे नियम हे सन २०२१ पासून लागू केले जाणार आहेत. मात्र, उच्च शिक्षणातील गुणवत्ता ही प्राध्यापक पदांची भरती झाली नसल्याने घटली असल्याचा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) व इतर काही संस्थांचा अहवाल आहे. त्यामुळे पात्रतेसाठी नवे नियम आणण्याऐवजी देशातील विविध राज्यांमध्ये असलेल्या विद्यापीठ, महाविद्यालयांतील प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत यूजीसीकडून सर्वेक्षण होणे गरजेचे होते.विद्यापीठाच्या पातळीवर पीएच.डी. बंधनकारक केली असली, तरी पीएच.डी.च्या उपलब्ध होणाऱ्या जागा, मार्गदर्शकांची संख्या लक्षात घेता, या पातळीवरील नियुक्तीसाठी आगामी तीन वर्षांमध्ये कितीजण पात्रता पूर्ण करणार हा प्रश्नच आहे. पीएच.डी.च्या पर्यायांमुळे महाविद्यालयांच्या पातळीवरसंशोधन सुरू झाले असून, ती आता गती घेत असतानाच ‘नेट’च्या पर्यायामुळे त्याला बगल मिळण्याची शक्यता आहे.९५ प्राध्यापक पीएच.डी.धारकशिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये कायमस्वरूपी २६२ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या १५२ कार्यरत असून त्यांतील ९५ प्राध्यापक हे पीएच.डी. पदवीधारक आहेत. भरती बंदीमुळे ११० पदे रिक्त आहेत.आकडेवारी दृष्टिक्षेपातअनुदानित महाविद्यालयांची संख्या : ११७१विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांची संख्या : सुमारे ३५००राज्यातील सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा : ९५११कोल्हापूर विभागांतर्गत सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा : ११००राज्यातील दहा विद्यापीठांतील प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा : ८६४