शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अंत्यसंस्कारासाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:43 AM

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारावेळच्या अडचणींचा विचार करता, कोल्हापूर महापालिकेप्रमाणे लाकडांऐवजी शेणींचा वापर ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारावेळच्या अडचणींचा विचार करता, कोल्हापूर महापालिकेप्रमाणे लाकडांऐवजी शेणींचा वापर करण्याचा पर्याय आता गावागावांत स्वीकारण्याची गरज आहे. केवळ पर्यावरण वाचले पाहिजे म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीने कृतिशील पाऊल उचलल्यास ते निश्चितच अनुकरणीय होणार आहे.हिंदू समाजामध्ये पार्थिव दहन करण्याची प्रथा आहे. यासाठी किमान १२ मण लाकडे अंत्यसंस्कारासाठी वापरली जातात. सध्या १५० ते १७५ रुपये मण दराने ही लाकडे आणली जातात. पावसाळ्यामध्ये वाळलेली लाकडे मिळतानाही अडचणी येतात. तसेच पावसामुळे स्मशानभूमीकडे ही लाकडे नेणे अडचणीचे ठरते.एवढे करूनही रॉकेलच्या दोन बाटल्या, चार-पाच किलो मीठही सोबत न्यावे लागते. अग्नी दिल्यानंतर घरची मंडळी गेल्यानंतर मग लाकडांवर रॉकेल शिंपडून तसेच नंतर मीठ मारून नीट दहन होईल, अशी व्यवस्था केली जाते. जर लाकडे अर्धवट ओली असतील तर आणखी निराळ्याच अडचणी निर्माण होतात. अनेकांना हे लाकडांचे १८०० ते २००० रुपयेही देणे परवडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.सध्या कोल्हापूरमध्ये महापालिका टेंडर काढून शेणींची खरेदी करते. एक शेणी ५0 पैशांना पडते. अनेकदा तरुण मंडळे लाखो शेणी स्मशानभूमीला दान देत असतात. हीच पद्धत ग्रामीण भागामध्येही वापरता येईल. कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर एवढ्या शेणी उपलब्ध होतात, तर ग्रामीण भागामध्ये त्या सहज उपलब्ध होणार आहेत.सध्या ज्या पद्धतीने चिता रचण्यासाठी लाकडे लावली जातात, त्याच पद्धतीने हवा खेळती राहील अशा पद्धतीने शेणी लावल्या की पार्थिवाचे दहन होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. अशी पद्धत अवलंबल्यामुळे एकीकडे लाकडेही कमी लागणार असून, त्यामुळे खर्चही कमी येणार आहे.काय आहेकोल्हापूर पॅटर्न...कोल्हापूर महापालिकेच्या वतीने मृतदेहांसाठी मोफत दहन व्यवस्था गेली अनेक वर्षे राबविण्यात येत आहे. नगरसेवकांचे पत्र आणल्यानंतर या ठिकाणी मोफत दहन केले जाते. एका पार्थिवासाठी सुरुवातीला खाली तीन मणाचे मोठे कंडे ठेवले जातात. त्यावर पार्थिव ठेवल्यानंतर ४०० ते ५०० शेणींनी ते झाकले जाते. खाली लवकर तापणाऱ्या विटा असल्याने २० रुपयांचा कापूर शेणींवर ठेवून पेटविला की केवळ पंधरा मिनिटांमध्ये चिता पेटायला लागते. शेणींमधून खेळणाºया वाºयामुळे अग्नी प्रज्वलित होऊन व्यवस्थितपणे दहन होते.रॉकेल नको की टायर नकोबहुतांश ठिकाणी अंत्यसंस्कारांवेळी रॉकेल आणि टायरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. लाकडे नीट वाळली नसतील तर चिता लवकर पेटत नाही. त्यासाठी मग गाड्यांचे टायर वापरले जातात. गडहिंग्लजसारख्या ठिकाणी तर अंत्यसंस्कारांचे साहित्य देतानाच सोबत दोन-तीन सायकलींचे, गाडीचे टायरही दिले जातात. मात्र शेणींचा वापर केल्यास रॉकेल, टायर काहीही लागत नाही.लाकडांचा खर्च २०००,तर शेणींचा ७०० रुपयेअंत्यसंस्कारासाठी किमान १२ मण लाकडे लागतात. म्हणजे १८०० रुपये आणि ट्रॉलीचे भाडे असा २००० रुपये खर्च येतो; तर दुसरीकडे शेणी लावल्या तर तीन मण लाकडांचे ४५० रुपये आणि ५० पैशांना एक शेणी अशा ५०० शेणींचे २५० रुपये असे ७०० रुपयांमध्ये शेणी लावून अंत्यसंस्कार होऊ शकतात. या ठिकाणी विषय केवळ पैशांचा नसला तरी लाकडांच्या कमतरतेमुळे यापुढील काळात ही शेणींची पद्धत अवलंबणे आवश्यक ठरणार आहे.