शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

‘दौलत’साठी एकत्र येण्याची गरज

By admin | Updated: March 2, 2015 00:02 IST

सुनील शिंत्रे : ‘दौलत’ बचाव संघर्ष समितीचा शेतकरी, कामगार मेळावा

चंदगड : दौलत कारखाना विकत घ्यायला बरेच लोक तयार आहेत; पण बंद कारखाना चालू करायला कोणीही पुढे येत नाही. ही चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची व कामगारांची शोकांतिका आहे. न्यायालयीन आणि रस्त्यावरील दोन्ही लढाया एकाचवेळी लढण्याची वेळ आहे. यासाठी सर्वांनी वेळ काढून दौलत हे घरचे कार्य समजून एकत्र येण्याचे आवाहन आजरा कारखान्याचे संचालक प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील कारखाना कार्यस्थळावर दौलत बचाव संघर्ष समितीच्यावतीने बोलावण्यात आलेल्या शेतकरी, कामगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुभाष जाधव होते.विजय पाटील यांनी प्रास्ताविक करून केवळ राजकारणासाठी दौलतचा वापर करणारे व सत्ता भोगणाऱ्यांनी शेतकरी व कामगारांना दु:खाच्या खाईत लोटले आहे. त्यांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आल्याचे सांगितले.प्रा. शिंत्रे पुढे म्हणाले, रस्त्यावरील चळवळ उभी केली, तर त्याला ठरावीक वेळेत यश आले पाहिजे, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिल्यास एव्हीएच हटेल व दौलत सुरू होईल. यासाठी आपले सर्व स्तरावर सहकार्य असल्याचे सांगितले.यावेळी प्रा. सुभाष जाधव म्हणाले, दौलतच्या संचालक मंडळाला कारखाना सुरू करण्यासाठी भरपूर संधी दिली. त्यांच्यावरून गेल्या चार वर्षांत काहीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आंदोलन यशस्वी करण्यासाठी वेगळी रणनीती ठरवावी लागेल. केंद्रीय कृषीमंत्री, केंद्रीय सचिव व सहकारमंत्री यांची भेट घेऊन दौलतवर प्रशासक आणण्यासंदर्भात विचार करावा लागणार आहे. दिलेला प्रशासक हा शेतकरी व कामगारांचा विचार करणारा असावा. आजी-माजी संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कर्जाची जबाबदारी निश्चित करून फौजदारी दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आमदार, खासदार यांचेही सहकार्य घेऊ, असे सांगितले. यावेळी आंदोलन किंवा संतप्त झालेल्या कामगार व शेतकऱ्यांनी आणखी किती वर्षे आंदोलन करायचे? ज्यांनी दौलत लुटली ते दौलतकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. ते उजळमाथ्याने समाजात फिरत आहेत. त्यांना दहशत दाखवून राजीनाम्याला प्रवृत्त करावे लागेल, असे मत हणमंत पाटील, दत्तू कडोलकर यांनी मांडले. यावेळी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न डॉ. जाधव यांनी करताच अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी त्यांना विरोध करत गांधी मार्गाने आंदोलन करून ‘दौलत’चा प्रश्न सुटणार नाही, तीन वर्षे आंदोलन करूनही निर्ढावलेले संचालक मंडळ दौलत सुरू करण्याला असमर्थ ठरले आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे हे पहिले काम आहे. गोपाळराव पाटील व संचालकांनी शनिवारपर्यंत राजीनामे न दिल्यास सोमवारी त्यांच्या घरी जाऊन किंवा कोठेही भेटतील तेथे राजीनामे घेऊया, असे सांगताच त्याला कामगार व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. यावेळी एस. एम. कोले, नारायण धामणेकर, दिवाकर पाटील, कृष्णा रेगडे, प्रा. आबासाहेब चौगुले यांनीही मार्गदर्शन केले. कॉम्रेड आण्णा शिंदे, सतीश सबनीस, शिवसेना तालुकाप्रमुख महादेव गावडे, प्रभाकर खांडेकर, जे. जी. पाटील, अर्जुन कुंभार, धोंडिबा रोकडे, सुरेश हरेर, महादेव फाटक, आदी उपस्थित होते.