शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कारवाईची गरज, कुरुंदवाड येथे शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने भेसळीचा प्रश्न चर्चेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 15:45 IST

निवासी सैनिकी पॅटर्न शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचारी अशा सुमारे ४० जणांना विषबाधा

गणपती कोळीकुरुंदवाड : येथील सैनिकी पॅटर्न निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याने शहर व परिसरातील दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बासुंदी खाल्ल्याने विषबाधा झाली असताना अन्न व औषध प्रशासन अधिकारी भेसळीचा शोध घेण्याऐवजी तीव्र तापमानाचे कारण सांगून दुग्धजन्य पदार्थ करणाऱ्या भेसळखोरांना एक प्रकारे क्लीनचीट दिली जात आहे. त्यामुळे पालकांसह नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या भेसळखोरांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.येथील निवासी सैनिकी पॅटर्न शाळेतील विद्यार्थ्यांना रविवारी दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचारी अशा सुमारे ४० जणांना विषबाधा झाली होती. बाधित विद्यार्थी व कर्मचारी यांंच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, धोका टळला आहे. जेवणात बासुंदी असल्याने बासुंदी खाऊन पाणी प्यायल्याने तसेच उच्च तापमान यामुळे डीहायड्रेशन झाल्याचा अंदाज शाळा व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी करत आहेत.या घटनेनंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद वैद्यकीय यंत्रणा सतर्क होऊन वैद्यकीय सेवा पुरवित आहेत. शाळा व्यवस्थापनाने वेळीच उपचार केल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका टळला आहे. सोमवारी अन्न व औषध प्रशासन अधिकारी महेश मासाळ यांनी रुग्णालयात जाऊन घटनेचा पंचनामा केला.  टोळी सक्रिय असल्याची चर्चाशहर व परिसरात दूध, खवा, बासुंदीसह इतर दुग्धजन्य पदार्थांची भेसळ सर्रासपणे सुरू आहे. यापूर्वी अनेकदा भेसळीचे प्रकार या परिसरात उघडकीस आले आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या जुजबी कारवाईमुळे अद्याप भेसळीचे प्रमाण सुरूच आहे. भेसळीतून जादा कमाई करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ करणारी टोळी सक्रिय आहे. त्यामुळे अशा भेसळखोरांचा शोध घेऊन भेसळ करण्याचे धाडस पुन्हा होऊ नये, अशी कारवाई करणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूध