शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीगळती रोखण्यास अ‍ॅक्शन प्लॅनची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 10:55 IST

कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात इतर शहरांच्या मानाने १५ ते २० टक्के जादा गळती होत आहे. ही गंभीर बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ करण्याची गरज आहे. तात्पुरत्या मलमपट्टीने हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी दरवर्षीच्या बजेटमधून भरघोस निधीची तरतूद करावी लागणार आहे.

ठळक मुद्देबजेटमध्येच निधीची तरतूद करावी लागणार कोट्यवधींच्या खर्चात होणार बचत

कोल्हापूर : शहरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात इतर शहरांच्या मानाने १५ ते २० टक्के जादा गळती होत आहे. ही गंभीर बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ करण्याची गरज आहे. तात्पुरत्या मलमपट्टीने हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी दरवर्षीच्या बजेटमधून भरघोस निधीची तरतूद करावी लागणार आहे.श्ािंगणापूर योजनेतील पाईपलाईनमधून सर्वाधिक गळती आहे. वास्तविक योजनेच्या ठेकेदाराने एक किलोमीटरवर एक व्हॉल्व्ह बसविण्याचे प्रस्तावित होते. त्याचे पैसेही त्याने घेतले. मात्र, व्हॉल्व्ह बसविले नाहीत. त्यामुळे जादा दाबामुळे पाईपलाईनला वारंवार गळती लागत आहे.

योजनेवर जेवढा खर्च झाला नाही, त्यापेक्षा जास्त महापालिकेला तिच्या दुरुस्तीवर करावा लागला. त्यामुळे ‘एमजीपी’कडे देखभाल सोपवून, त्यांच्याकडून कामे करून घेतल्यास २० टक्के गळती कमी होईल.

महापालिकेवरील खर्चही कमी होणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष पथक नेमून कारवाई करण्याची गरज आहे. काही ग्राहक मीटरच्या अगोदरच व्हॉल्व्हमधून पाणी घेत असल्याचे समोर आले आहे; अशांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

‘अमृत’ योजनेतून ११५ कोटींच्या निधीतून ४५० किलोमीटरच्या पाईपलाईन बसविण्यात येत आहेत. मात्र, बहुतांश नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण्यासाठी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून निधी मिळण्यासाठी तत्काळ प्रस्ताव करून शासनाला पाठविणे आवश्यक आहे. यातून निधी मिळाल्यास तसेच शिंगणापूर योजना एमजीपीकडे गेल्यास शहर गळतीमुक्त होईल.- विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते, महापालिका

पाणीउपसा करण्यासाठी, जलशुद्धिकरण तसेच टाकीमध्ये पाणी सोडण्यासाठी वर्षाला २४ कोटींचे पाण्याचे बिल महापालिकेला द्यावे लागते. गळती काढल्यास निम्म्या पाण्यावरील खर्च कमी होणार आहे. त्यामुळे वर्षाला १२ कोटींची बचत होणार आहे. नवीन पाईपलाईनचा खर्चही या बचतीमधून निघू शकतो.- भूपाल शेटे,ज्येष्ठ नगरसेवक, महापालिका

जलशुद्धिकरणावरील खर्च ‘पाण्यात’पंचगंगा नदीतून उपसा केलेल्या पाण्यावर जलशुद्धिकरण केंद्रामध्ये प्रक्रिया केली जाते. त्यावर महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. गळतीमुळे शुद्ध केलेले लाखो लिटर पाणी दररोज वापराविना वाया जात आहे. गळती रोखल्यास हा खर्च वाचणार आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी