शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

Lok Sabha Election 2019 Results :सुमारे एक हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे राबले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:27 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी गुरुवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ९९० अधिकारी व कर्मचाºयांचे हात राबले. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल परिसरातील शासकीय गोदाम येथे सकाळी सात वाजता स्ट्रॉँगरूमचे सील

ठळक मुद्दे जिल्हाधिकाºयांकडून मतमोजणी केंद्रांची पाहणीकोल्हापूर मतदारसंघातील मतमोजणीचे चित्र

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी गुरुवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ९९० अधिकारी व कर्मचाºयांचे हात राबले. रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल परिसरातील शासकीय गोदाम येथे सकाळी सात वाजता स्ट्रॉँगरूमचे सील उघडले. त्यानंतर आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांनी सर्व मतमोजणी केंद्रांची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या.

सकाळी सात वाजता स्ट्रॉँगरूमचे सील उघडलेजिल्हाधिकारी दौलत देसाई, चंदगड, राधानगरी मतदारसंघाच्या निरीक्षक अलका श्रीवास्तव, कागल, कोल्हापूर दक्षिणच्या निरीक्षक हीना नेतम, करवीर व कोल्हापूर उत्तरच्या निरीक्षक नंदा कुशरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे प्रतिनिधी नगरसेवक सत्यजित कदम, शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचे प्रतिनिधी मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, आदींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता स्ट्रॉँगरूमचे सील उघडण्यात आले.

‘कोल्हापूर उत्तर’ची मतमोजणी अर्धा तास उशिराशासकीय बहुउद्देशीय हॉल परिसरातील ‘ए’ गोदाम या इमारतीत चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांची, ‘सी’ गोदाम येथे करवीर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली, तर ‘डी’ गोदाम येथे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची मतमोजणी साडेआठ वाजता सुरू झाली. या मतदारसंघात फेºया कमी असल्याने अर्धा तास उशिरा मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय प्रत्येकी वीस टेबलवर मतमोजणी झाली. यामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघात १९, राधानगरीमध्ये २२, कागलमध्ये १८, कोल्हापूर दक्षिणमध्ये १७, करवीरमध्ये १८ व कोल्हापूर उत्तरमध्ये १६ फेºया झाल्या. एका फेरीला सरासरी अर्धा तास इतका वेळ लागला.

सुमारे हजार अधिकारी, कर्मचाºयांचे राबले हातकोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण ९९० अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र राबले. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सतीश धुमाळ, चंदगडच्या सहायक निवडणूक अधिकारी विजया पांगारकर, राधानगरीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी, कागलचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी त्रिगुण कुलकर्णी, कोल्हापूर दक्षिणचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे, करवीरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, कोल्हापूर उत्तरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्यासह मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक, रांग अधिकारी, अतिरिक्त सूक्ष्म निरीक्षक, टपाली मतमोजणी पर्यवेक्षक, टपाली मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, शिपाई, संगणक आॅपरेटर, आदींचा समावेश होता.दुपारी चारपर्यंत ‘ईव्हीएम’ची मतमोजणी पूर्णमतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. विधानसभानिहाय फेºया पूर्ण होऊन जवळपास दुपारी चारपर्यंत ‘ईव्हीएम’ची मतमोजणी पूर्ण झाली; परंतु ती ‘व्हीव्हीपॅट’च्या चिठ्ठ्या मोजल्याशिवाय जाहीर करण्यात आली नाही. यानंतर केंद्रनिहाय ‘व्हीव्हीपॅट’च्या चिठ्ठ्यांची मोजणी सुरू करण्यात आली. ती रात्रीपर्यंत सुरू होती. एका केंद्राला सरासरी पाऊण तासाचा कालावधी लागला.सैनिकांची मतमोजणी स्कॅनिंगऐवजी पोस्टल पद्धतीनेचजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत पोस्टल मतांच्या मोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यामध्ये प्रथम निवडणूक अधिकारी, कर्मचाºयांची मते मोजण्यात आली. ही प्रक्रिया दुपारी दोन वाजता पूर्ण झाली. त्यानंतर तीनच्या सुमारास सैनिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सैनिकांच्या मतपत्रिका या ‘ईटीपीडीएस’ प्रणालीनुसार असल्याने त्याचे लखोट्यापासून मतपत्रिकेच्या बारकोडनुसार स्कॅनिंग करून मोजणी केली जाणार होती; परंतु देशपातळीवरच सर्व्हरला प्रॉब्लेम आल्याने निवडणूक आयोगाने दुपारी पोस्टल पद्धतीनेच या मतपत्रिकांची मोजणी करावी असे आदेश निवडणूक विभागाला दिले. त्यानुसार त्या पद्धतीनेच सायंकाळपर्यंत ही मोजणी सुरू होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालkolhapur-pcकोल्हापूर