शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे मिशन विधानसभा सुरू : शनिवारी मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:22 IST

लोकसभा निवडणुकीची राज्यातील रणधुमाळी संपल्यावर लगेचच राष्ट्रवादीने विधानसभेसाठी जोर-बैठका सुरू केल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यस्तरीय आढावा बैठकीचे नियोजन केले असून, तसे निरोप जिल्हा, तालुका पातळीवर पोहोचही झाले आहेत. येत्या उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईत पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी या सर्वांना बैठकीचे बोलावणे धाडण्यात आले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार मार्गदर्शन करणारराज्यातील आजी-माजी खासदार, आमदारासह पदाधिकाऱ्यांना निरोप

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची राज्यातील रणधुमाळी संपल्यावर लगेचच राष्ट्रवादीने विधानसभेसाठी जोर-बैठका सुरू केल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यस्तरीय आढावा बैठकीचे नियोजन केले असून, तसे निरोप जिल्हा, तालुका पातळीवर पोहोचही झाले आहेत. येत्या उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईत पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी या सर्वांना बैठकीचे बोलावणे धाडण्यात आले आहे.विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने लोकसभा निवडणुकीतच विधानसभेच्या प्रचाराचे नारळ सर्वच पक्षांतील विद्यमान व इच्छुकांनी फोडले आहेत. स्वत: पवार यांनी तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. निवडणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर लागलीच पवार हे राज्यभर दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने फिरत आहेत.

या दौऱ्याच्या अनुषंगाने नापिकी, पाणीटंचाई, चार छावण्या हा विषय त्यांनी सातत्याने लावून धरला आहे. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आणि दुष्काळ हे तीन विषय आगामी विधानसभा निवडणुकीत तापण्याची चिन्हे असल्याने आतापासून वातावरण निर्मिती करण्याचे काम पवार यांनी हाती घेतले आहे.शनिवारी होणाऱ्या या आढावा बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा लेखाजोखा घेण्याबरोबरच भविष्यात विधानसभेला सामोरे जाताना पक्षाची कोणती दिशा असणार आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे. लोकसभेला कोणी कोणाला मदत केली, याचा हिशेब मांडला जाणार आहे.

शिवाय प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे पुढील काळात उमेदवारीचा घोळही निर्माण होणार आहे, याचा कानोसा या बैठकीच्या निमित्ताने घेतला जाणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर