शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आजरा तालुका संघावर राष्ट्रवादीचा झेंडा

By admin | Updated: July 28, 2015 01:22 IST

शाहू आघाडीचा दारुण पराभव : रवळनाथ विकास आघाडीचे वर्चस्व

आजरा : आजरा तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने राष्ट्रवादीच्या श्री रवळनाथ विकास आघाडीने अशोक चराटी, रवींद्र आपटे, अंजना रेडेकर व शिवसेनेचे संभाजी पाटील यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीवर एकतर्फी विजय मिळविला. शाहू आघाडीला १९ पैकी फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.प्रचंड चुरशीने पार पडलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया येथील अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृहात पार पडली. सर्वप्रथम इतर संस्था गटांचे मतदान मतमोजणीस घेण्यात आले. यामध्ये रवळनाथच्या संभाजी पाटील (हत्तिवडे) यांनी विजयाचे खाते उघडले. त्यानंतर सेवा संस्था गटाच्या मतमोजणीमध्ये सातपैकी सहा जागांवर विजय मिळवित ‘रवळनाथ’ पॅनेलने विजयी घोडदौड कायम ठेवली. महादेव पाटील-धामणेकर यांची एकमेव जागा वगळता इतरत्र शाहू आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. निकालाचा कल शेवटपर्यंत सत्तारूढ आघाडीच्या बाजूने राहिला.सहायक निबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ३० टेबलांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. श्रीपतराव देसाई, अशोक चराटी, रवींद्र आपटे व अंजनाताई रेडेकर यांच्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक समजला जातो. भाजप व स्वाभिमानीच्या मदतीने मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, उदय पवार व जयवंतराव शिंपी यांनी जिल्हा बँकेतील पराभवाचे उट्टे काढले. (वार्ताहर)विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढीलप्रमाणे विकास सेवा संस्था - बाळासाहेब आजगेकर (४९), आप्पासाहेब देसाई (४५), मुकुंदराव तानवड (४५), विठ्ठल देसाई (४५), धोंडिराम परीट (४८), राजाराम पाटील (४८), महादेव पाटील-धामणेकर (४६). व्यक्ती सभासद गट - देसाई मधुकर कृष्णाजी (४२३४), सुधीर राजाराम देसाई (४४२५), महादेव जोतिबा हेब्बाळकर (४१०८), गणपती विष्णू सांगले (४१०६), नारायण नाना सावंत (४१९६), तांबेकर संभाजी मारुती (३९३३). इतर मागास प्रतिनिधी - गोविंद नारायण पाटील (४४७५), भटक्या विमुक्त जाती जमाती शिवानंद अर्जुन पाटील (४६१०). अनु. जाती जमाती प्रवर्ग - निवृत्ती जानबा कांबळे (४७१२). इतर संस्था प्रवर्ग - संभाजी पाटील (हत्तिवडे ६१). महिला राखीव प्रवर्ग : देसाई राजलक्ष्मी अजित (४५४९), मायादेवी पांडुरंग पाटील (४३१०).