शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बँकेचे सत्ताकारण: मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यास राष्ट्रवादीचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:07 IST

'मुश्रीफ यांच्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशात नावारूपास आली'

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशात नावारूपास आली. मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता राखला. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, राजीनाम्यास आमचा विरोध आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला.मंत्री मुश्रीफ यांनी सोमवारी रात्री सांगली येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या कार्यक्रमात आपण जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, बँकेच्या संचालक मंडळासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा बँकेत झाली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर अध्यक्षस्थानी होते.माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे नेतृत्व आहे. जिल्हा बँकेच्या कारभाराच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत.जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, दहा वर्षांपूर्वी बँकेवर प्रशासक होते. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सत्ता आल्यानंतर त्यांनी शिस्तबद्ध काम करत बँकेला देशपातळीवर पोहोचवले. त्यांच्या नेतृत्वाची आम्हा संचालकांना गरज असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ देणार नाही.यावेळी, ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळाेखे, शीतल फराकटे, अमरसिंह माने, बाळासाहेब देशमुख, नितीन दिंडे, आप्पासाहेब धनवडे, संभाजी पवार, संतोष धुमाळ, विकास पाटील, विनय पाटील आदी उपस्थित होते.