सातारा : जिल्ह्यात फलटण, वाई, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर आणि सातारा येथे राष्ट्रवादीचा ‘गजर’ झाला असला तरी पाटणची जागा मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीकडून खेचून घेतली. काँग्रेसने पूर्वीच्याच दोन जागा कायम ठेवल्या आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा १६,४१८ मतांनी पराभव केला.जिल्ह्यात फलटण, वाई, कोरेगाव, माण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, पाटण आणि सातारा हे आठ विधानसभा मतदारसंघ असून, यावेळी पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, दीपक चव्हाण, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे अन् मकरंद पाटील हे विद्यमान आमदार पुन्हा विधानसभेत पोहोचले आहेत. विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर तसेच माजी आमदार मदन भोसले, सदाशिवराव पोळ, दगडू सकपाळ यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तत्कालीन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह यांचा पाटणमध्ये झालेला पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. येथून शिवसेनेचे शंभूराज देसाई निवडून आले आहेत.सातारा जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांत ८७ उमेदवार नशीब आजमावत होते. विधानसभेसाठी बुधवार, दि. १५ रोजी मतदान झाले होते. मात्र, निकालानंतर यापैकी ६९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. यामध्ये काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या एका तर बसप, मनसेच्या सर्वच उमेदवारांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)(संबंधित वृत्त हॅलो पानावर)शिवेंद्रसिंहराजे प्रथम, शशिकांत शिंदे दुसरेजिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील विजयी उमेदवारांपैकी सातारामधून शिवेंद्रसिंहराजे यांचे ४७,८१३ मताधिक्य सर्वाधिक आहे. कोरेगावातून शशिकांत शिंदे यांनी ४७,२४७ इतके मताधिक्य घेऊन दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे.गतवेळच्या तुलनेत वाईमध्ये मकरंद पाटील यांच्या मताधिक्यात १६,८७७ ने वाढ झाली आहे. गतवेळी २१,८२५ तर यावेळी मिळालेले मताधिक्य ३८,७०२ इतके आहे.गेल्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांचे मताधिक्य ४,०९८ तर यावेळी मिळालेले मताधिक्य २३,३५१ इतके आहे. त्यांच्या मताधिक्यात १९,५२३ इतकी वाढ झाली.सातारा, पाटणमध्ये काँग्रेसची वाताहतसातारा आणि पाटण मतदारसंघांत काँग्रेसची वाताहत झाली. सातारा मतदारसंघात काँग्रेसच्या रजनी पवार पाचव्या क्रमांकावर (७,१८७ मते) फेकल्या गेल्या. पाटणमध्ये हिंदुराव पाटील यांना फक्त ७,६४२ मते मिळाली. त्यांच्या आणि विजयी उमेदवारांच्या मतांमधला फरक ९७,२३२ इतका आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य
By admin | Updated: October 20, 2014 22:29 IST