शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Navratri : जोतिबाची तिसऱ्या माळेला पाच पाकळ्यामध्ये सालंकृत कमळपुष्प महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:56 IST

 नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प पाच पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली.

ठळक मुद्देतिसऱ्या माळेला जोतिबाची पाच पाकळ्यामध्ये सालंकृत कमळपुष्प महापूजामहाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी

जोतिबा/कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प पाच पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली.श्री. जोतिबा देव नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात  नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळे निमित कमळ पुष्प पाच पाकळ्यातील महापूजा बांधली.

या पुजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे. नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री. जोतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपडयाच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते.

तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक अवताराचे प्रतिक आहे. दोन पाकळ्या या सगुण-निर्गुण भक्तीचे प्रतिक मानले जाते. सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला. नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो. भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली. 

तेल ' अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री १२ .३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले .

जोतिबा मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले

नवरात्रोत्सव काळात जोतिबाचे मंदिर २२ तास खुले असते.पहाटे ३ वाजता महाघंटे चा नाद करून मंदिराचे दरवाजे उघडे जातात. रात्री १ वाजता मंदिर बंद केले जाते. इतर वेळी मंदिर पहाटे ४ वाजता उघडे आणि रात्री ११ वाजता बंद होते.

१५ वेळा तोफेची सलामी  नवरात्रोत्सव काळात दररोज नऊ दिवस ९, खंडेनवमीला दोन आणि विजय द समीला ४ अशा एकूण १५ तोफेच्या सलामी धडाडतात. तोफेच्या सलामीने च धुपारती पालखीचा प्रारंभ व सांगता होत असते.

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा