शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मुटकलवाडीत साकारणार नवी देवराई

By admin | Updated: June 8, 2016 00:20 IST

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे विधायकतेला पाठबळ : चार दिवसांत ५0 झाडे, ५0 हजारांची देणगी जमा

आंबा : मुटकलवाडी (ता. शाहूवाडी) येथील ग्रामदैवत मुटकेश्वरच्या टेकडीवर नव्या देवराईचा संकल्प निसर्गप्रेमींच्या पाठबळातून साकारत आहे. ग्रामस्थांचा श्रमसहभाग व निसर्गप्रेमींच्या वृक्ष देणगीतून ही देवराई तीन वर्षांत साकारेल. आंब्यातील निसर्गप्रेमी प्रमोद माळी यांच्या संकल्पनेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम होत आहे. ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानातून प्रेरणा घेत जलपुनर्भरणासाठी देवराईची उभारणी ही वेगळी पायवाट मळणारी ठरत आहे.पर्यावरणदिनी देवराईच्या संकल्पनेसाठी मुटकलवाडीतील ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्यात जागृती केली गेली. दरम्यान, माळी यांनी व्हॉट्स अ‍ॅपवरील ग्रुपना तीन वर्षांपुढील भारतीय प्रजातीची झाडे देणगी रूपाने देण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केलेच व केवळ मेसेजद्वारे चार दिवसांत पन्नास झाडे लागवडीसाठी पन्नास हजारांची देणगी जाहीर करून थेट माळी यांच्या बँक खात्यावर जमा केली. सोशल मीडियावरील या प्रतिसादाने संयोजकांतील उत्साह वाढला आहे. एकेकाळी मुटकलवाडीत चाळीस उंबरे असून, जंगलाने वेढलेली. तसेच दहा वर्षांपूर्वी गावात मुबलक पाणी होते; पण वेळीच घटती भूजल पातळी व वृक्षसंवधर्नाकडे लक्ष न दिल्याने सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. वाडी झाडीविना उजाड पडली आहे. पाण्यासाठी भटकंती करून पाणी मिळवावे लागत आहे. भविष्यातील पाणी संवर्धनासाठी वृक्षलागवडीबरोबर जलपुनर्भरण कार्यक्रम राबविण्याचा संकल्प करून देवराईच्या उभारणीला प्रारंभ होत आहे. यावर्षी वृक्षारोपण, तर पुढील वर्षी याच देवराईत वेली व झुडुपांच्या लागवडीचे आणि जलपुनर्भरणाचे धोरण असल्याचे माळी यांनी मांडले. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर व ग्रामस्थांचा सहभाग यामुळे अल्पवधीत देवराई उभारणीला प्रारंभ होत आहे. लावलेली झाडे श्रद्धेने जपली जावीत व टंचाईग्रस्त वस्तीत पाणीभरण व्हावे म्हणून मुटकेश्वराच्या टेकडीची निवड करण्यात आली.१५ जूनला वृक्षलागवडदेवराई उभारणीचा प्रारंभ १५ जूनला वृक्षलागवडीने होत आहे. यामध्ये जांभूळ, आंबा, रतनगुंज, कुसूम, पांगारा, मूचकुंद, बहावा, हिरडा, बेहडा, ऊंडी, शाल्मली, कदंब, वड, पिंपळ, पिंपरन, नागचाफा, रूद्राक्ष, आदी प्रजातीच्या झाडे उपलब्ध केल्याचे ग्रामपंचायत सदस्य बाळू लाड यांनी सांगितले. मोलाचा सहभागवृक्ष देणगीत क्षमा पालेकर (मुंबई) यांनी अकरा हजार, तर अमोल वाळिंबे (पूणे) यांनी सहा हजार, यांच्यासह मोनेरा फौंडेशन (आंबा), नेचर लव्हर्स ग्रुप (कोल्हापूर), शैलभ्रमर ग्रुप (कोल्हापूर), आंबा वाईल्ड लाईफ ग्रुप (पुणे), ट्रव्हेला टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा सहभाग मोलाचा आहे.