शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू
3
१२ वर्षांनी गुरु-रवि युती, ७ राशींची ३० दिवस चांदीच चांदी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-लाभ!
4
अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ
5
Share Market Today: ३ दिवसांनंतर शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १२१ अंकांनी वधारला, या स्टॉक्समध्ये तेजी
6
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
7
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
8
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
9
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली
10
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
11
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
12
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
13
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
14
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
15
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
16
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
17
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
18
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
19
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
20
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत

नाट्य संमेलन स्वागताध्यक्षपदी साठे

By admin | Updated: January 23, 2015 00:54 IST

सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना ज्यांची सन्माननीय उपस्थिती असते, ज्यांच्या असण्याने वातावरण प्रसन्न होते,

बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. अशोक साठे यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. बेळगावातील संगीत, नाटक, व्याख्याने, शास्त्रीय नृत्य, परिसंवाद, चर्चासत्रे, अशा सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना ज्यांची सन्माननीय उपस्थिती असते, ज्यांच्या असण्याने वातावरण प्रसन्न होते, आजूबाजूचे लोक सहजतेचा अनुभव घेतात, असे बेळगावातील विलोभनीय, सर्वसमावेशक, जगन्मित्र व्यक्तिमत्त्व, नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून लाभल्याने सर्वांनाच आनंद होत आहे.डॉ. साठे यापेक्षा अशोक काका याच नावाने सुपरिचित असणाऱ्या डॉ. साठे यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९३० साली बेळगाव येथेच झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्युनिसिपार्टीच्या मराठी शाळा नंबर १ मध्ये झाले. पुढे पाचवी ते अकरावी (मॅट्रिक)पर्यंतचे शिक्षण सरदार्स हायस्कूलमध्ये झाले. फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथूने इंटर सायन्स होऊन पुढे त्यांनी ग्रँट मेडिकल महाविद्यालय मुंबई येथून १९५३ साली ‘एमबीबीएस’ची पदवी संपादित केली. एप्रिल १९५४ पासून बेळगावमध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. २७ नोव्हेंबर १९५४ रोजी विवाह होऊन लताताई त्यांच्या सहचारिणी झाल्या.क्रिकेट, टेनिस, गोल्फ, बॅडमिंटन या सर्व खेळांत ते निष्णात आहेत. नाटक हा तर त्यांचा प्राण आहे. आजपर्यंत २५ नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या असून, अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ग्रँट मेडिकल महाविद्यालयात असताना पु. ल. देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बिचारे सौभद्र’ या नाटकातील भूमिकेपासून त्यांच्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात झाली. बेळगावमध्ये आल्यावर कै. बाप्पा शिरवईकरांच्या ‘कलोपासक’ या संस्थेतून त्यांच्या दिग्दर्शनाखाली श्रीमंत, पोरखेळ, अंमलदार, राणीचा बाग अशा अनेक नाटकांतून भूमिका केल्या. त्यानंतर वांगमय चर्चा मंडळाच्या अनेक संगीत नाटकांचे यशस्वी दिग्दर्शन त्यांनी केले.