शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

शिवाजी विद्यापीठात उद्या राष्ट्रीय परिसंवाद

By admin | Updated: December 18, 2014 00:01 IST

भौतिकशास्त्र विभागातर्फे आयोजन : मटेरियल सायन्स मुख्य विषय

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातर्फे ‘फिजिक्स आॅफ मटेरियल्स् अ‍ॅण्ड मेटरियल्स् बेस्ड डिव्हाईस फॅब्रिकेशन’ विषयावर शुक्रवारी (दि.१९) व शनिवारी (दि.२०) राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) डीएसएअंतर्गत होणाऱ्या परिसंवादात देशातील विविध संशोधक मटेरियल्स् सायन्समधील नवीन संशोधन, संकल्पना सादर करणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. एन. जे. पवार व संयोजक डॉ. राजीव व्हटकर यांनी आज, बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पवार म्हणाले, परिसंवादात नॅनो सायन्स्, नॅनो टेक्नॉलॉजी, पॉलिमर फिजिक्स, मॅग्नेटिक मटेरियलबाबत संशोधन व शोधनिबंध सादर होतील. भौतिकशास्त्र विभागाने संबंधित विषयांवर यापूर्वी एक आंतरराष्ट्रीय, दोन राष्ट्रीय परिसंवाद घेतले आहेत. डॉ. व्हटकर म्हणाले, परिसंवादाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात मुंबईतील ‘आयआयजी’चे संचालक डॉ. डी. एस. रमेश यांच्या हस्ते होईल. यावेळी ‘युजीसी’च्या सायंटिफिक रिसर्च संस्थेचे केंद्र संचालक डॉ. व्ही. गणेशन, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार प्रमुख उपस्थित असणार आहेत. परिसंवादात प्रा. एस. के. चक्रवर्ती, पंकज पोतदार, राजेश कुमार, पी. एस. पाटील, एस. दत्त, एस. कौशिक, आर. आर. देशमुख आदी मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय देशातील सुमारे दोनशे प्राध्यापक, संशोधक सहभागी होतील. त्यासह दक्षिण कोरिया आणि तैवानमधील प्राध्यापक शोधनिबंध सादर करतील. शनिवारी दुपारी मिठीबाई कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, डॉ. सी. डी. लोखंडे, पी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)