शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात राष्ट्रीय ग्राहक दिन :  ग्राहकांची फसवणूक न होण्याची दक्षता घ्या : सविता भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:43 IST

ग्राहकांची कसल्याही प्रकारे फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा सविता भोसले यांनी सोमवारी येथे केले.

ठळक मुद्देकोल्हापूरात राष्ट्रीय ग्राहक दिन ग्राहकांची फसवणूक न होण्याची दक्षता घ्या : सविता भोसले

कोल्हापूर : ग्राहकांची कसल्याही प्रकारे फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा सविता भोसले यांनी सोमवारी येथे केले.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा पुरवठा विभागातर्फे भवानी मंडप येथे आयोजित केलेल्या ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शनाचे उदघाटनप्रसंगीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बी. आर. माळी, महाराष्ट्र राज्य ग्राहक समिती सदस्य अरुण यादव, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे- जाधव, महसुल नायब तहसिलदार अश्विनी वरुटे, कोल्हापूर शहर रास्त भाव संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मोरे आदी उपस्थित होते.सविता भोसले म्हणाल्या, जनतेनं विशेषत: सर्वच ग्राहकांनी सदैव जागृत राहून, ग्राहकांच्या हक्क आणि कर्तव्यांची जोपासनेस प्राधान्य द्यावे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ग्राहकाच्या न्याय हक्कासाठी सदैव कार्य करत असून ग्राहकांनी आपली फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागावी.अरुण यादव म्हणाले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकास स्वत:ची तक्रार स्वत: दाखल करता येते. ग्राहकांनी आपल्या न्याय हक्कासाठी स्वत: पुढे यायला हवे. ग्राहक न्याय मंचाबरोबरच ग्राहक पंचायती तालुकास्तरावरील संघटनेमार्फतही ग्राहकांनी आपले प्रश्न सोडवावेत. माधवी शिंदे- जाधव यांनी स्वागत केले. यावेळी सर्व रेशन दुकानदार, पुरवठा निरिक्षक व नागरिक उपस्थित होते.

स्टॉलमधून ग्राहकांचे प्रबोधनराष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित केलेल्या अन्न, औषध व प्रशासन, भारत गॅस, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, भारत संचार निगम लिमिटेड, वैधमापन शास्त्र, आरोग्य विभाग, कृषिविभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी, डाकघर अशा विविध विभागांनी स्टॉल लावून ग्राहकांना प्रात्याक्षिके तसेच माहिती पत्रकाव्दारे प्रबोधन केले.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर