शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

कोंडी केल्यामुळेच हेल्पर्स संस्थेचा दिला राजीनामा : नसिमा हुरजूक यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 11:37 IST

गेली वर्षभर विविध मार्गांनी कोंडी केल्याने संस्थेच्या अध्यक्षपदाचा मी स्वत:हून राजीनामा दिला; परंतु मी संस्थेची विश्वस्त म्हणून मात्र राहणार असल्याचे नसिमा हुरजूक यांनी सोमवारी लोकमतला सांगितले.

ठळक मुद्देकोंडी केल्यामुळेच हेल्पर्स संस्थेचा दिला राजीनामा : नसिमा हुरजूक अपंग पुर्नवसनाचे काम हाच श्वास

विश्वास पाटीलकोल्हापूर : अपंगांचे पुर्नवसन, त्यांचे जीवन फुलविणे हाच माझा श्वास आहे. हे काम थांबले तर माझा श्वासही थांबेल, त्यामुळे या कामापासून मी कधीच बाजूला जाणार नाही परंतु आता ह्यहेल्पर्सह्णमध्ये जे लोक काम करत आहेत, त्यांच्यासोबत काम करणे मला कदापि शक्य नाही. त्यांनीच माझी गेली वर्षभर विविध मार्गांनी कोंडी केल्याने संस्थेच्या अध्यक्षपदाचा मी स्वत:हून राजीनामा दिला; परंतु मी संस्थेची विश्वस्त म्हणून मात्र राहणार असल्याचे नसिमा हुरजूक यांनी सोमवारी लोकमतला सांगितले.हुरजूक यांनी मांडलेला भूमिका अशी : संस्थेचा व्याप वाढू लागल्यावर विश्वासातील आणि संस्थेचे काम चांगल्या पद्धतीने पाहू शकतील अशी माणसे हवीत म्हणून विश्वस्त मंडळाच्या परवानगीनंतरच भाऊ व बहिणीच्या पतीस संस्थेच्या कामास सहभागी केले.

तुम्ही संस्थेसाठी काम केले पाहिजे, असा आग्रह धरण्यासाठी त्यावेळी स्वत: पी. डी. देशपांडे हे आमच्या घरी आले होते. तुम्हाला या लोकांबद्दल आक्षेप होता तर आम्ही स्वत:हून त्यांना बाजूला केले असते परंतु ज्यापद्धतीने वर्षभर डोळा ठेवून तुम्ही त्यांना संस्थेतून बाहेर काढले, हे क्लेशदायक आहे.

मला वाटते, संस्थेची सर्वसाधारण सभा आता सप्टेंबरमध्ये आहे. आता विश्वस्त मंडळामध्ये १ विरुद्ध १० असे बलाबल आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर ते मलाही विश्वस्त पदावरूनही दूर करतील. संस्थेच्या जडणघडणीत मी पुढाकार घेतला तरी हे मी एकटीने उभे केलेले काम नव्हे. हे टीमवर्क आहे आणि त्यासाठी अनेक घटकांचे हातभार लागले आहेत, अशी कृतज्ञता मी कायमच व्यक्त केली.

मला जे पुरस्कार मिळाले त्याची सर्व रक्कम मी संस्थेत जमा केली. नव्या पिढीतील कुणी तरी अध्यक्षपद स्वीकारावे यासाठी मी गेली आठ वर्षे आग्रह करत होते. ह्यस्वप्ननगरीह्णचे स्वप्न कसे सत्यात उतरले याबद्दल मला पुस्तक लिहायचे होते. परंतु या टप्प्यावर मला या पद्धतीने संस्थेतून जावे लागत आहे याचे निश्चितच दु:ख आहे.संस्थेच्या सिंधुुदुर्ग जिल्ह्यांतील स्वप्ननगरीतील काजू प्रकल्पातील तोट्यास मला जबाबदार धरले जात आहे; पण जे निर्णय संस्थेचे म्हणून सर्वांनी घेतले त्याच्या तोट्यास मी एकटीच कशी जबाबदार हे मला समजत नाही. या प्रकल्पाची कंपनी करण्यास माझा विरोधच होता. कारण कंपनी केल्यावर त्याचे मोजमाप फायदा-तोट्यातच होणार.

पहिल्या वर्षी या प्रकल्पातून ६१ लाख रुपये नफा झाला होता नंतरच्या टप्प्यात तुम्ही या कंपनीच्या उत्पन्नावर वसतिगृह, शेती, दूध प्रकल्प, कोल्हापुरातील व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र व शिलाई विभाग आणि दोघा अधिकाऱ्यांचे मानधन एवढा खर्च टाकल्यावर तोटा झाला. त्याचदरम्यान केंद्र सरकारने काजूचा आयात कर कमी केल्यामुळे प्रकल्पास तोटा झाला.

ही तोट्याची रक्कम संस्थेचीच होती. कुठल्या बँकेचे कर्ज नव्हते. ही रक्कमही आपण सर्व मिळून प्रयत्न करून उभी करूया, असे माझे म्हणणे होते परंतु त्यांना माझ्या माथ्यावर तोट्याचे खापर फोडायचे होते.वादाचा केंद्रबिंदू..स्वप्ननगरी प्रकल्पाचे व्यवस्थापक साताराम पाटील व मधुताई पाटील यांचे मासिक वेतन वीस हजारांपर्यंत असताना साताराम यांनी कोल्हापुरात ४० लाखांचा भूखंड खरेदी करून त्यावर आता ५० लाखांहून जास्त रकमेचे बांधकाम सुरू केले आहे.

हा पैसा आला कुठून असे संस्थेचे म्हणणे होते. त्यांना त्याबद्दल संस्थेने सेवेतून कमी केले आहे; परंतु साताराम यांची म्हाकवे (ता. कागल) येथे शेतजमीन असून त्याची परिस्थिती चांगली आहे. त्याला बाजू मांडण्याचीही संधी दिली नाही, असे हुरजूक यांचे म्हणणे आहे. संस्थेत येण्यापूर्वी हे साताराम किराणा दुकानात हेल्पर म्हणून नोकरी करत होते.संस्थेच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य...हुरजूक म्हणाल्या, व्यक्तिपेक्षा कधीही संस्था मोठी असते. लोक येत-जात राहतील परंतु संस्था टिकली पाहिजे, उभे केलेले काम पुढे गेले पाहिजे, असा विचार मी कायमच केला. त्यामुळेच राजीनामा देऊन महिना होऊन गेला तरी त्याची वाच्यता कुठेच केली नाही. कारण आरोप-प्रत्यारोपांनी संस्थेच्या प्रतिमेवर व त्यायोगे देणगीसह कामांवरही परिणाम होईल, असे मला वाटले; परंतु आता या विषयाला तोंड फुटल्यानेच काही गोष्टी बोलत आहे.जवळच्या माणसांकडून वेदनामला आपल्याच म्हणजे कुटुंबातील व्यक्तीपेक्षाही जी जास्त जवळची माणसे होती, त्यांच्याकडूनच जास्त त्रास दिला गेला. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा, असा विचार करून पदावरून दूर झाले.

टॅग्स :Divyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर