शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद रस्ते, तुडुंब वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 13:23 IST

तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोकणला जोडणारा प्रमुख राज्य महामार्ग म्हणजे कोल्हापूर ते रत्नागिरी होय. हा ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोकणला जोडणारा प्रमुख राज्य महामार्ग म्हणजे कोल्हापूर ते रत्नागिरी होय. हा मार्ग पुणे ते बंगलोर या राष्टÑीय महामार्गाला जोडताना तो कोल्हापूर शहरातून जातो. त्यामुळे त्यावरील वाहतुकीचा प्रचंड भार कोल्हापूर शहराला सोसावा लागत आहे. परिणामी, शहराला वाहतुकीच्या प्रचंड कोंडीला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावरील आसपासच्या सुमारे २६ हून अधिक गावांतील बहुतांश नागरिकांचा राबता हा कोल्हापूर शहरात असल्याने त्यांच्या वाहनांचा ताणही पडत आहे. शहरात प्रवेश करणारा मार्ग हा शिवाजी पुलावरून येतो. अरुंद पुलावरून एकाचवेळी मोठ्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. या मार्गावरून प्रवेश करणे म्हणजे जीवावर संकट ओढविण्याचा प्रकार होय.शहरात प्रवेशणाºया प्रमुख १२ मार्गांपैकी कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रमुख राज्य महामार्ग होय. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला गोवा, कोकण व पूर्वेकडे कर्नाटक राज्याकडे जाणाºया सर्व अवजड वाहनांची वाहतूक कोल्हापूर शहरातूनच होते. याशिवाय रोज किमान २६ ते २८ हजार वेगवेगळ्या वाहनांची ये-जा शिवाजी पूल मार्गे कोल्हापूर शहरातून होते. पन्हाळा ते कोल्हापूर या मार्गाच्या परिसरातील सुमारे २५ हून अधिक गावांतील नागरिकांचा नोकरीसह विविध निमित्ताने कोल्हापूर शहरात रोजचा राबता आहे. त्यामुळे त्यांचा दैनंदिन भार कोल्हापूर शहराला सोसावा लागत आहे. मलकापूर ते कोल्हापूरपर्यंतचा मार्ग अवघा १५ फूट रुंदीचा अरुंद असल्याने त्यामानाने त्यावर वाहतुकीचा भार अधिक असल्याने रस्ता रुंदीकरण होणे काळाची गरज बनली आहे.या मार्गावरील वाहतूक कोल्हापुरात प्रवेश केल्यानंतर तिचा परिणाम शहरातील वाहतुकीवर पावलोपावली वाहतुकीच्या कोंडीने दिसून येतो. शिवाजी पूल मार्गे शहरात वाहनांनी प्रवेश केल्यानंतर तोरस्कर चौक, शनिवार पेठ चौक, सीपीआर चौक, दसरा चौक, तसेच गंगावेश चौकात त्याचा प्रमुख परिणाम दिसून येतो. अरुंद रस्ते आणि वाहतुकीचे लोंढे यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.स्टेशन रोडवर अतिरिक्त भारकोकणची वाहतूक शहरात आल्यानंतर ताण पडणारे तोरस्कर चौक, गंगावेश चौक, सीपीआर चौक व दसरा चौक हे मोठे करून त्यांचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. दसरा चौकात वाहने आल्यानंतर ती कसबा बावडामार्गे राष्टÑीय महामार्गाकडे वळविणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील स्टेशन रोडवरील भारही कमी होण्यास मदत होईल. चौकाचौकांत दिशादर्शक फलकही लावल्यास वाहतूक रेंगाळून वाहतुकीची कोंडी होणार नाही.रस्ता चौपदरी हवारत्नागिरीहून येणारा मार्ग कोल्हापूर शहरापर्यंत, शिवाजी पूल ते तावडे हॉटेलपर्यंत (राष्टÑीय महामार्गापर्यंत) शहरांतर्गत मार्ग अत्यंत अरुंद असल्याने त्याचे चौपदरीकरण करणे गरजेचे आहे. रस्त्याची अवघी १५ फूट रुंदी व त्यावरील वाहतुकीची गर्दी पाहता हा रस्ता चौपदरीकरण केल्यास वाहतूक कोंडीचा काहीअंशी प्रश्न मार्गी लागेल. शहरातील या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचेही रुंदीकरण होणे गरजेचे आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस