शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'महादेवी'साठी रविवारी नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेश पदयात्रा, राजू शेट्टी यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:32 IST

नांदणी मठानंतर आता सीमाभागातील शेडशाळ मठाला हत्ती देण्यासंबंधी पत्र गेले

कोल्हापूर : वनतारातून महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी एक रविवार महादेवी हत्तीणसाठी अशी मोहीम राबवून सामाजिक दबाब निर्माण करण्यात येणार आहे. रविवारी दि.३ ऑगस्टला पहाटे चार वाजता नांदणी मठ ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी ४५ किलोमीटरची आत्मक्लेश मूक पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.शेट्टी म्हणाले, शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मठातील महादेवी हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला आहे. पेटाच्या सुपारीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील देवस्थान आणि मठातील सर्व हत्ती वनताराला नेण्यात येणार आहेत. 

वाचा: वनताराची टीम नांदणीला भेट देणार, हत्तीणीसाठी सर्वपक्षीय नेते धावले मठाकडेनांदणी मठानंतर आता सीमाभागातील शेडशाळ मठाला हत्ती देण्यासंबंधी पत्र गेले आहे. अशाप्रकारे पेटाची दादागिरी, अंबानींसाठीची केंद्र सरकारची भूमिका याविरोधात भावना असलेले सर्व धर्म, पक्ष पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यामध्ये ‘महादेवी हत्तीणीला परत आणणार’ हा एकच फलक असेल.ज्या नांदणी मठातून महादेवीला शेवटचा निरोप देण्यात आला, तेथूनच रविवारी पहाटे चार वाजता पदयात्रेला सुरुवात होईल. ही पदयात्रा सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर येईल. येथे राष्ट्रपती यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पदयात्रेची सांगता होईल.