शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:54 IST

राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार नामदेवराव भोईटे (वय ८९) यांचे मंगळवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

ठळक मुद्देराधानगरी-भुदरगडचे माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे निधनराधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथे भोईटे यांचा जन्म

कोल्हापूर : राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार नामदेवराव भोईटे (वय ८९) यांचे मंगळवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.राजकारणाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात आपल्या कतृत्वाने वेगळा ठसा उमटविणारे नामदेवराव भोईटे यांच्यावर कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पालकरवाडी येथील भोईटे हायस्कूलमध्ये दुपारी दोन वाजेपर्र्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कसबा वाळवे गावातून अंत्ययात्रा निघणार असून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथे अतिशय सामान्य कुटूंबात भोईटे यांचा जन्म झाला. शिक्षक असलेल्या नामदेवरावांनी नंतर राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. राधानगरी पंचायत समितीवर निवडून गेलेले नामदेवराव नंतर सभापती झाले. त्यानंतर काँग्रेसकडून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले.

अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून तेथे त्यांनी नावलौकिक मिळविला. त्यानंतर त्यांनी पक्षाकडे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून उमेदवारी मागितली, तथापि पक्षाने तेव्हा उमेदवारी नाकारल्याने त्यांनी १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि विजयी झाले. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. सध्या ते मुदाळ येथील हुतात्मा वारके सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष होते. राधानगरी तालुक्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आहेत.

टॅग्स :MLAआमदारkolhapurकोल्हापूर