शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 18:33 IST

निवडे (ता.गगनबावडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गगनबावडा पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'माझे कुटूंब,माझी जबाबदारी ' मोहिमेच्या शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व सभापती संगिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देनिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमजिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केला मोहिमेचा शुभारंभ

साळवण - जनतेच्या सहभागातून कोवीड मूक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने राबविलेली 'माझे कुटूंब माझी जबाबदारी ' ही मोहिम गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये राबविणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरजिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले. ते निवडे (ता.गगनबावडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गगनबावडा पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'माझे कुटूंब,माझी जबाबदारी ' मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व सभापती संगिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमे अंतर्गत १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोंबर या कालावधीत मोबाईल अ‍ॅपद्वारे आरोग्य पथकामार्फत प्रत्येक नागरिकाची माहीती घेतली जाणार असून ही मोहिम दोन टप्यात राबविली जाणारे आहे.

गगनबावडा तालुक्याच्या ३८८७७ लोकसंख्येसाठी ७७७५ कुटुंबे असून यासाठी एकूण ३० पथके तयार केली आहेत, या पथकामध्ये आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका व सरपंच कार्यरत राहणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अजयकुमार गवळी यांनी दिली.माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, गगनबावडा पंचायत समिती सभापती संगिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अजयकुमार गवळी, सामाजिक कार्यकर्ते दादू पाटील, माजी सरपंच सहदेव कांबळे, आरोग्य विस्तार अधिकारी विजय सावंत, अर्जुन इंगळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक अरुण मेथे, आनंद काळे, परचारिका आय.व्ही. पुजारी आदीसह आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद