माझी निवडणूक तरुणांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:17 AM2019-07-22T00:17:23+5:302019-07-22T00:17:27+5:30

सेनापती कापशी : युवक हा प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतो. युवक जर पेटून उठला तर तो काय करू शकतो, हे ...

My election is in the hands of youngsters | माझी निवडणूक तरुणांच्या हातात

माझी निवडणूक तरुणांच्या हातात

Next

सेनापती कापशी : युवक हा प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतो. युवक जर पेटून उठला तर तो काय करू शकतो, हे मी अनेक निवडणुकीत अगदी जवळून पाहिले आहे. निवडणुकीच्या निकालांचे परिणाम तो बदलू शकतो. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तरूण सज्ज झाले असून, कागल विधानसभा मतदारसंघातील तरुणांनीच माझी निवडणूक हातात घेतली आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
सेनापती कापशी (ता. कागल) येथे आयोजित ‘साद तरुणाईची....संवाद युवकांशी’ या सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते.
नोटाबंदी, जीएसटी सारख्याच्या चुकीच्या निर्णयामुळे देशात मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार झाले ही वस्तुस्थिती आहे. देशातील कोणताही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही. खोटी-नाटी स्वप्ने दाखवून जनतेला फसविण्याचे काम भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून सुरू आहे. शिवसेनेने मोर्चे काढत बसण्यापेक्षा राजीनामे देऊन सरकारमधून बाहेर पडायचे धाडस दाखवले पाहिजे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर आता जनतेने आक्रमक झाले पाहिजे, असेही आमदार मुश्रीफ यावेळी म्हणाले.
माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यावेळी म्हणाले, आमदार मुश्रीफ यांच्यामुळे नागणवाडी प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण करून येत्या पावसाळ्यात पाणी साठविण्याचे कामही तेच पूर्ण करतील, यावर जनतेचा विश्वास आहे. चिकोत्रा प्रकल्पात सर्वांत जास्त पाणी हे म्हातारीचे पठारावरून येत आहे. हे कामही आमदार मुश्रीफ यांनीच पूर्ण केले आहे. आपापसातील मतभेद विसरून मुश्रीफ यांना ताकद देऊन सर्वांनी एकत्र येऊन येणारी विधानसभेची निवडणूक लढूया.
सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, तमनाकवाडचे सरपंच दत्तात्रय चव्हाण, तालुका संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव पाटील, विजय सातवेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रवीण नाईकवाडे यांनी, तर प्रास्ताविक सूर्यकांत भोसले यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास भय्या माने, युवराज पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक सोनार, जे. डी. मुसळे, नेताजी मोरे, अंकुश पाटील, मधुकर नाईक, बळवंत तिप्पे, सागर पाटील, बाबूराव अस्वले, बाळासाहेब खतकल्ले, आदीसह सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुण व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: My election is in the hands of youngsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.