शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृत आईवर केले परस्पर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 18:17 IST

Crimenews, Police, Kolhapurnews करवीर तालुक्यातील उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी येथील एका तरुणाने अपघातात मृत्यू झालेल्या आपल्या आईवर कुणालाही माहिती न देता, परस्पर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देउपवडेपैकी न्हाव्याचीवाडीतील धक्कादायक प्रकार मुलावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी येथील एका तरुणाने अपघातात मृत्यू झालेल्या आपल्या आईवर कुणालाही माहिती न देता, परस्पर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात नीलेश रघुनाथ दळवी (वय २६, रा. उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. बाळाबाई रघुनाथ दळवी (वय ५५) असे मृत आईचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ६ डिसेंबर रोजी नीलेश दळवी हा आपल्या आईला घेऊन दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होता. त्यावेळी दुचाकीवरून त्याची आई बाळाबाई दळवी ह्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांच्या कानास व डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली; पण पुढे दोन दिवसांत त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनली. उपचारांचा खर्च मोठा असल्याने व तो गरीब परिस्थितीमुळे न परवडणारा असल्याने नीलेश दळवी याने अत्यवस्थ स्थितीत आईला घरी नेले.

त्यानंतर दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला; पण अपघातातील जखमीच्या मृत्यूची माहिती करवीर पोलीस ठाण्याला न देता मृतदेहावर परस्पर उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

याबाबत चौकशी होऊन नीलेश दळवी याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे हे. कॉ. किरण माने करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस