शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
3
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
4
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
5
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
6
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
7
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
9
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
10
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
11
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
12
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
13
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
14
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
15
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
16
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
17
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
18
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
19
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
20
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल

गुणरत्न सदावर्तेच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे एसटी बँकेच्या १२ संचालकांचे बंड - संतोष शिंदे 

By भीमगोंड देसाई | Published: December 08, 2023 2:25 PM

नियमबाह्यपणे मेव्हण्याची नियुक्ती, चुकीचे ठराव रद्द करणार

कोल्हापूर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑप बँकेत काहीही संबंध नसताना गुणरत्न सदावर्ते यांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे त्यांच्या नेतृत्वाविरोधात १२ ते १३ संचालकांनी बंड केले आहे. त्यांना सदावर्तेकडून धमक्या आणि चारचाकी वाहनांची अमिषे दाखवली जात आहेत.सदावर्तेे यांनी आपले मेव्हणे सौरभ पाटील यांची बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियमबाह्य निवड केली आहे. ३८ कर्मचाऱ्यांची चुकीच्या पध्दतीने निवड केली आहे. अशा पध्दतीने बँकेच्या हिताविरोधातील ठराव रद्द करण्यासाठी बंडखोर संचालक यापुढील काळात सक्रिय असतील, अशी माहिती बंडखोर संचालकांचे प्रवक्ते व एस. टी कष्टकरी जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी शुक्रवारी दिली.शिंदे म्हणाले, सदावर्ते बँकेत कोणत्याही पदावर नाहीत. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष आहेत. जन संघांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेल्या पॅनेलची सत्ता बँकेत आली. म्हणून सदावर्ते बँकेच्या कारभारात लुडबूड करीत आहेत. त्यांच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे आणि जातीच व्देषाच्या वक्तव्यामुळे ४८० कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढून घेतल्या. परिणामी बँकेचा सीडी रेशो बिघडला.बँक अडचणीत आली आहे. म्हणून बारा ते १३ संचालकांनी त्यांचे नेतृत्व झुगारले. बँकेची स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांनी बंड केले आहे. दरम्यान, बँकेचे पदसिध्द अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एसटीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. यामुळे बारा संचालकांकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाचा विषय येणार नाही. पण बँकेच्या पुढील कारभारात बंड केलेले १२ संचालक चुकीचे ठराव रद्द करतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्ते