शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

बैल अंगावर आल्यावर शिंगे पकडणारच, मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:56 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्सेनिक गोळ्या खरेदी, पंधरावा वित्त आयोगाबाबत आपल्यावर टीका केल्यानंतर त्या-त्यावेळी प्रत्युत्तर दिले. परवा तर हसन मुश्रीफ यांची कृती म्हणजे आ बैल मुझे मार असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र बैल अंगावर आल्यावर शिंगे पकडणारच, असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देबैल अंगावर आल्यावर शिंगे पकडणारच, हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवारअनावधानाने बोललो म्हणून कबूल केले तर वाद संपुष्टात

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्सेनिक गोळ्या खरेदी, पंधरावा वित्त आयोगाबाबत आपल्यावर टीका केल्यानंतर त्या-त्यावेळी प्रत्युत्तर दिले. परवा तर हसन मुश्रीफ यांची कृती म्हणजे आ बैल मुझे मार असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र बैल अंगावर आल्यावर शिंगे पकडणारच, असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर सोमवारी पत्रकार परिषदेत केला.आरोपांबाबत आपण त्यांना माफी मागायला सांगितले होते, त्यांनी माफी राहू दे अनवधानाने वक्तव्य केले व सत्तेत असताना ईडी, आयकर मागे लावून दिलेला त्रास हा राजकीय हेतूने होता, असे कबूल केले तर हा वाद संपुष्टात येईल. त्यांनी प्रतिसाद दिला नाहीतर मग दावा दाखल करावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.मंत्री मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास विभागाने ५ कोटी जनतेसाठी आर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीचे अधिकार जिल्हा पातळीवर दिल्यानंतर दोन रुपयांच्या गोळ्या २३ रुपयांना खरेदी करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

पंधराव्या वित्त आयोगातून ८० टक्के ग्रामपंचायतींना व प्रत्येकी १० टक्के जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी माझा सत्कार केला. त्यानंतर निधी वाटपाचा निर्णय तर केंद्र सरकारचा आहे, मग हसन मुश्रीफ हार कसे घालून घेतात? असे कुत्सित विधान पाटील यांनी केले.

या दोन्ही गोष्टींचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागण्यास आपण सांगितले होते, त्यावर पाटील यांचे उत्तर नाही. एक दिवस त्यांनी आपणास व सतेज पाटील यांना पत्र पाठवून कोरोनाकाळात किती मदत केली, याचे आत्मचिंतन करण्यास सांगितले.

यावर पाटील यांचे दोन चेहरे आहेत, एक चेहरा परोपकारी, प्रांजळ, लोकांना प्रामाणिक आहे, असा भास व्हावा आणि दुसरा सत्ता संपत्तीच्या जोरावर विरोधकांना आयुष्यातून उठविण्याचा आहे. राज्य बँक व जिल्हा बँकेवर विभागीय सहनिबंधकांवर दबाव टाकून कलम ८८, पूर्वलक्षी प्रभावाने कारवाई करण्यास भाग पाडले.

न्यायालयात आरएसएसच्या वकिलांची फौज उभा केली. आता त्यांना विनंती आहे, त्यांनी गैरसमजुतीतून व अनावधानाने आरोप केले व ईडी, आयकरची कारवाई ही राजकीय हेतूने होती, हे कबूल करून वाद संपुष्टात आणावा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.चंद्रकांत पाटील यांना क्लीनचिट मिळणारचंद्रकांत पाटील यांच्या निवडणूक शपथपत्रातील कारवाईत काहीही तथ्य नाही, त्या सरकारी कंपन्या आहेत. निवडणुकीत विजयी झालेल्यांना आपण त्रास देत नाही. सत्ता ही लोककल्याणासाठी असते, त्यांनी त्रास दिला म्हणून आम्ही देणार नाही, त्यांनी निश्चिंत रहावे. असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे सोज्ज्वळ मुलगाआदित्य ठाकरे व आपला आठ महिन्यांचा संपर्क, मात्र ते सोज्ज्वळ मुलगा आहे. विनाकारण त्यांची बदनामी करण्याचे कटकारस्थान असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.सुशांतला मरणोत्तर भारतरत्नची मागणी होईलसंपूर्ण देश कोरोनाच्या संकटात होरपळत असताना, विरोधकांनी सुशांतसिंग राजपूतचा मुद्दा काढला. गांजा ओढणारा, महिलांशी संबंध असणाऱ्यांचे आपण किती उदात्तीकरण करायचे? उद्या, कदाचित त्याला मरणोत्तर भारतरत्नची मागणीही होऊ शकेल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर