शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन याचिकेचा मुश्रीफ यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 18:14 IST

kolhapur, Hasan Mushrif, zp पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवाटपाबाबत जिल्हा परिषदेतील विरोधकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतचा आढावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी घेतला. यावेळी त्यांनी १५ ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीबाबतही काही सूचना केल्या.

ठळक मुद्देन्यायालयीन याचिकेचा मुश्रीफ यांनी घेतला आढावा पंधरावा वित्त आयोग, जि. प. पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

कोल्हापूर : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवाटपाबाबत जिल्हा परिषदेतील विरोधकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतचा आढावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी घेतला. यावेळी त्यांनी १५ ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीबाबतही काही सूचना केल्या.अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, राजेश पाटील यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहावर मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी मिळणाऱ्या निधीबाबतही सविस्तर चर्चा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यावेळी उपस्थित होते.मुश्रीफ कोरोनातून बरे झाल्याच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांनी ही भेट घेतली. याचिकेची सद्य:स्थिती यावेळी मुश्रीफ यांना सांगण्यात आली. शासन, जिल्हा परिषद यांच्या वतीने वकील देण्यात आलेले आहेत. अध्यक्षांच्या वतीने आणखी एक वकील देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. तसेच पंधराव्या वित्त आयोगाचा शासन आदेश ज्यांनी काढला, त्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करा, अशी सूचना त्यांनी मित्तल यांना केली.डिसेंबरनंतर विविध योजनांचा निधी वितरण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे कोरोनामुळे जरी अडचणी असल्या तरी याबाबत आपण सकारात्मक राहा. जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन सर्वसाधारण सभा ऑनलाईन घ्यायची की सभागृहात घ्यायची हे ठरवा, अशाही सूचना त्यांनी केल्या. आवाडेप्रणित ताराराणी आघाडीच्या वंदना मगदूम आणि भाजपचे राजवर्धन निंबाळकर व अन्य सदस्य यांनी स्वनिधी, पंधरावा वित्त आयोग निधी यांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १५ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.मुश्रीफ यांच्याकडे निधीची मागणीसर्वच पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला निधी देण्याची मागणी केली. पावसाळ्यामुळे रस्ते खराब झाले आहेत. शाळांच्या दुरुस्त्या करावयाच्या आहेत. चौथ्या मजल्यासाठी मंजूर झालेला निधी अजून मिळालेला नाही. तोदेखील लवकर मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरोनामुळे शासनाला प्रचंड खर्च करावा लागत आहे. तरीही नव्या वर्षात निधीवितरण सुरळीत होईल, असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ