शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ यांनी लावली भाजपच्या काळातील खरेदीची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:59 IST

भाजप, जनसुराज्य, शिवसेनेच्या काळात जिल्हा परिषदेत झालेल्या खरेदीची चौकशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लावली आहे. चार दिवसांपूर्वीच मुश्रीफ यांनी ही चौकशी लावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी शासन आदेश काढण्यात आला असून, ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांनी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुश्रीफ यांनी लावली भाजपच्या काळातील खरेदीची चौकशीजिल्हा परिषदेत खळबळ, वॉटर एटीएम, कचरा व्यवस्थापन यंत्रे खरेदीचा समावेश

कोल्हापूर- भाजप, जनसुराज्य, शिवसेनेच्या काळात जिल्हा परिषदेत झालेल्या खरेदीची चौकशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लावली आहे. चार दिवसांपूर्वीच मुश्रीफ यांनी ही चौकशी लावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी शासन आदेश काढण्यात आला असून, ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांनी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सध्या वॉटर एटीएमच्या खरेदीचा विषय गाजत असून गावांची निकड आणि निवड यांची सांगड न घालता ही गावे निवडण्यात आली. अनेक ठिकाणी ही एटीएम बंद आहेत. निविदेप्रमाणे साहित्याचा वापर न करणे अशा अनेक कारणांमुळे याबाबत सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली होती. गेल्यावर्षी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी निधी दिला होता. मात्र जानेवारी २०२० मध्ये सत्तांतर होऊन जिल्हा परिषदेत दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेची सत्ता आली आहे.

परिणामी राजकीय संदर्भही बदलले आहेत. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठीचा उपाय म्हणून घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही गावांनी ही यंत्रणाच वापरलेली नाही. त्यामुळे या यंत्रणेच्या खरेदीचीही चौकशी आता होणार आहे.

चौदाव्या वित्त आयोगातून नेमकी काय खरेदी करावी याचे निकष दिले असताना अनेक ग्रामपंचायतींना टीव्ही, ई-लर्निंगचे साहित्य खरेदी करण्यास सांगण्यात आले होते. शासनाने घालून दिलेल्या निकषांना डावलून ही खरेदी झाली आहे का, याचीही चौकशी आता होणार आहे. हे सर्व विषय ग्रामीण पाणीपुरवठा, यांत्रिकी, पाणी व स्वच्छता आणि ग्रामपंचायत विभागाशी संबंधित असल्याने आता या सर्व खरेदी प्रक्रियांची चौकशी केली जाणार आहे.या सर्व प्रकरणांची वस्तुस्थिती, उपलब्ध कागदपत्रे आणि कामाची स्थळपाहणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या कामाबाबत चौकशी करावी, असे या चौकशी आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. चौकशी अधिकारी उदय जाधव यांना या प्रकरणांची सर्व कागदपत्रे आणि स्थळपाहणीसाठी सर्व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.वस्तुस्थिती बाहेर येईलभाजपच्या गेल्या तीन काळात झालेल्या खरेदीची ही चौकशी आहे. सदस्यांच्या या कामांबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे आता या चौकशीमधून वस्तुस्थिती बाहेर येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितच कारवाईही होईल, असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर