शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ, कोरे, सतेज पाटील यांच्यात गुफ्तूगू, ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:36 IST

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व ‘जनसुराज्य’ पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्यात शासकीय विश्रामगृहात स्वतंत्रपणे सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणावर तिन्ही नेत्यांमध्ये विचारविमर्श झाला.

ठळक मुद्देमुश्रीफ, कोरे, सतेज पाटील यांच्यात गुफ्तूगू, जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा‘गोकुळ’- कोरे आमच्यासोबतच राहतील : सतेज पाटील

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व ‘जनसुराज्य’ पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्यात शासकीय विश्रामगृहात स्वतंत्रपणे सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणावर तिन्ही नेत्यांमध्ये विचारविमर्श झाला.जिल्हा नियोजन मंडळाची बैठक शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. ही बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद झाली. ती सुरू असतानाच मंत्री हसन मुश्रीफ तेथून उठले आणि विश्रामगृहावर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ मंत्री सतेज पाटील हेही थोड्या वेळाने गेले. तत्पूर्वी मंत्री मुश्रीफ व आमदार विनय कोरे यांच्यात बंद दाराआड सुमारे वीस-पंचवीस मिनिटे चर्चा झाली. तेथून आमदार कोरे हे मंत्री पाटील यांच्या कक्षात गेले. तिथेही त्यांनी चर्चा केली.‘गोकुळ’ व जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत आमदार कोरे हे आपल्यासोबत राहावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला कर्णसिंह गायकवाड यांना सत्तारूढ गटातून उमेदवारी द्यायच्या अटीवर विनय कोरे हे महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांच्यासोबत जाणार होते. मात्र ठराव दाखल करण्याच्या वेळी आमदार कोरे यांनी वेगळी भूमिका घेतली.

कर्णसिंह गायकवाड हे विरोधी गटासोबत उपस्थित राहिल्याने त्यांची दिशा स्पष्ट झाली होती. शुक्रवारी तिन्ही नेत्यांच्या भेटीत याच विषयावर चर्चा झाली. जिल्हा बॅँकेवर ‘गोकुळ’च्या आघाडीचे काय परिणाम होतील; शेतकरी संघ, राजाराम साखर कारखान्यासह इतर बाबींवर भेटीत चर्चा झाल्याचे समजते.आणखी दोन संचालक संपर्कात‘गोकुळ’च्या तीन संचालकांनी सत्तारूढ गटापासून फारकत घेतली आहे. ते आमच्यासोबत राहतीलच. मात्र आणखी दोन संचालकांसह जिल्ह्यातील इतर नेतेही आमच्या संपर्कात आहेत. ‘थोडे थांबा, काय होते ते पाहा,’ असे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे पालकमंत्री या नात्याने सतेज पाटील यांची भेट घेतली. साहजिकच ‘गोकुळ’सह इतर राजकारणावर चर्चा झाली.- आमदार विनय कोरे

आमदार विनय कोरे हे मतदारसंघातील कामांसाठी भेटले. साहजिकच ‘गोकुळ’बाबत चर्चा होणारच. ते आमच्यासोबतच राहतील.- सतेज पाटील (पालकमंत्री, कोल्हापूर)

 

टॅग्स :PoliticsराजकारणGokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर