शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीजवळ युवतीचा खून, जळालेला मृतदेह बिडी कारखान्याच्या परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:35 IST

राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ४ वर निपाणीनजीक असलेल्या तीस छाप बिडी कारखान्याच्या परिसरात  गव्हाणी हद्दीत १८ ते २० वयोगटातल्या युवतीचा खून करून मृतदेह टाकण्यात आला आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून ओळख पटणे अवघड बनले आहे.

निपाणी :राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ४ वर निपाणीनजीक असलेल्या तीस छाप बिडी कारखान्याच्या परिसरात गव्हाणी हद्दीत १८ ते २० वयोगटातल्या युवतीचा खून करून मृतदेह टाकण्यात आला आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून ओळख पटणे अवघड बनले आहे.

गव्हाणी हद्दीत तीस छाप बिडी कारखान्याच्या परिसरात युवतीचा मृतदेह जाळल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. 

तीस छाप बिडी कारखान्याच्या परिसरात पाण्याच्या टाकीजवळ शनिवारी सकाळी गव्हाणी हद्दीत १८ ते २० वयोगटातल्या युवतीचा खून करून टाकण्यात आलेला मृतदेह येथील नागरिकांना आढळून आला.  त्यांनी याची माहिती देताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह अर्धवट जळाला असून मृतदेहावर ऍसिड टाकण्यात आल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असून अधिक तपास सुरू आहे.  मृतदेहाच्या अंगावर पंजाबी ड्रेस असून १८ ते २० वयोगटातील युवतीचा मृतदेह असल्याचा अंदाज आहे.निपाणी शहर पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती मिळताच मंडळ पोलीस निरीक्षक करणेशगौडा, उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला आणि सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.  येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह ठेवला असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. चेहरा ओळखू नये यासाठी ऍसिड वापरून मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनkolhapurकोल्हापूर