शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पद्मा चित्रमंदिर चौकात फिरस्त्याचा खून, सहकारी फिरस्त्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 19:55 IST

Crimenews Kolhapur : झोपण्याची जागा स्वच्छता करण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून पहिल्या मजल्यावरून ढकलून देऊन फिरस्त्याचा खून केला. नेहमी गजबजलेल्या येथील पद्मा चित्रमंदिर चौकातील व्यापार संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील साडी सेंटरसमोरील पॅसेजमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खुनाची घटना घडली. अमर (वय २५, पूर्ण नाव नाही), असे खून झालेल्या फिरस्त्या व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळीच संशयित आरोपी सूरज चंद्रकांत कांबळे (वय ३१) या फिरस्त्याला अटक केली.

ठळक मुद्देपद्मा चित्रमंदिर चौकात फिरस्त्याचा खून, सहकारी फिरस्त्यास अटकडोके आपटून पहिल्या मजल्यावरून दिले ढकलून

कोल्हापूर : झोपण्याची जागा स्वच्छता करण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून पहिल्या मजल्यावरून ढकलून देऊन फिरस्त्याचा खून केला. नेहमी गजबजलेल्या येथील पद्मा चित्रमंदिर चौकातील व्यापार संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील साडी सेंटरसमोरील पॅसेजमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही खुनाची घटना घडली. अमर (वय २५, पूर्ण नाव नाही), असे खून झालेल्या फिरस्त्या व्यक्तीचे नाव आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळीच संशयित आरोपी सूरज चंद्रकांत कांबळे (वय ३१) या फिरस्त्याला अटक केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी सूरज कांबळे व मृत अमर हे दोघे फिरस्ते असून, दहा वर्षांपासून एकत्र असतात. ते येथील पद्मा चित्रमंदिर चौकातील व्यापार संकुलच्या पॅसेजमध्ये रात्रीच्या वेळी झोपतात. सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता अमर हा व्यापारी संकुलातील पॅसेजमध्ये जेवत होता, नजीक पायरीवर संशयित सूरज हाही बसला होता. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. सूरज याने अमरला, तू जेवलेली जागा साफ कर, तेथेच मला झोपायचे आहे, असे सांगितले. त्यावरून अमरने उलट सूरजला, तुझ्या बापाची जागा आहे का? असे सुनावले.

दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. वाद सोडवण्यासाठी चौकातील चहा विक्रेता साद महमद शेख व त्याचा चुलतमामा वाहीद महात यांनी प्रयत्न केला; पण त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. झटापटीत अमरने सूरज यास दुकानगाळ्याच्या शटरच्या दिशेने ढकलले. त्यानंतर संतप्त सूरजने अमरची गळपट्टी धरून त्याचे डोके पॅसेजच्या ग्रीलवर आपटले.

डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला खाली ढकलून दिले. तळमजल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अमरचा काही क्षणांतच मृत्यू झाला. खून झाल्याचे निदर्शनास येताच साद व वाहीद यांनी फिरस्ता संशयित आरोपी सूरज कांबळेला लक्ष्मीमुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. वाघमोडे करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर