शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

खून करून आईच्या शरीराचे तुकडे करणाऱ्यास फाशीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 12:39 IST

Court Kolhapur : कावळा नाका परिसरातील वसाहतीमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या कारणावरून स्वत:च्या आईचा चाकू, सुरा व सत्तुराने शरीराचे तुकडे करुन क्रूरपणे खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने सुनील रामा कुचकोरवी (वर ३५) यास गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी त्यास दोषी ठरवले होते. कौर्याची सीमा गाठणारा दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने न्यायालयाने ही कठोर शिक्षा देण्यात आली.

ठळक मुद्देखून करून आईच्या शरीराचे तुकडे करणाऱ्यास फाशीची शिक्षा दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून न्यायालयाने दिला निर्णय

कोल्हापूर : कावळा नाका परिसरातील वसाहतीमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या कारणावरून स्वत:च्या आईचा चाकू, सुरा व सत्तुराने शरीराचे तुकडे करुन क्रूरपणे खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने सुनील रामा कुचकोरवी (वर ३५) यास गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी त्यास दोषी ठरवले होते. कौर्याची सीमा गाठणारा दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने न्यायालयाने ही कठोर शिक्षा देण्यात आली.शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावळा नाका परिसरातील अग्निशामक केंद्राच्या मागील वसाहतीमध्ये २८ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास संशयित सुनील याने आपली आई यल्लवा रामा कुचकोरवी (वय ६२) हिला दारू पिण्यास पैसे देत नाही. या कारणावरून चाकू, सुरी, सत्तूर अशा प्राणघातक हत्यारांनी खून केला होता. शेजाऱ्यांना चाहूल लागल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असता लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी तपास करून न्यायालयात संशयिताविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश (वर्ग ४) महेश जाधव यांच्या न्यायालयात सुरू होते. याप्रकरणी १२ साक्षीदार तपासले. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुराव्यावरून न्यायालयाने सुनील याला दोषी ठरवले. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर गुरुवारी न्यायालयाने सुनीलला दोषी ठरवले. त्याला जन्मठेप की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला होता. न्यायालयाने, गुरुवारी सुनीलने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे नमूद करून त्याला फाशीची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. नाईक यांनी मदत केली.

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर