शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

Kolhapur Crime: लग्नास नकार दिल्याने लिव्ह इनमधील प्रेयसीचा निर्घृण खून, सरनोबतवाडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:49 IST

सहा महिन्यांपासून दोघे रिलेशनमध्ये, हल्लेखोर पळाला

कोल्हापूर : लिव्ह इनमध्ये राहणारी समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय २३, सध्या रा. सरनोबतवाडी, मूळ रा. जयभवानी कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) हिने लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने तिचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. ३) दुपारी अडीचच्या सुमारास सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात भाड्याच्या घरात घडली. हल्लेखोर सतीश मारुती यादव (सध्या रा. शिवाजी पेठ, मूळ पेंद्रेवाडी उंड्री, ता. पन्हाळा) हा पसार झाला असून, त्याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.घटनास्थळ आणि सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, समीक्षा नरसिंगे ही आयशू राजेंद्र अंपले (२५, सध्या रा. सरनोबतवाडी, मूळ रा. तेलंगणा) या मैत्रिणीसह सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होती. दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत होत्या. समीक्षा ही गेल्या सहा महिन्यांपासून सतीश यादव याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. सतीश तिला लग्न करण्याचा आग्रह करीत होता. पण, चार वर्षांपूर्वी समीक्षाचे लग्न झाले होते. कौटुंबिक वादामुळे ती पतीसोबत राहत नव्हती. हा वाद न्यायप्रविष्ट असल्याने तिने लग्नास नकार दिला होता. यावरून दोघांमध्ये वादाचे खटके उडत होते. याच वादातून त्याने समीक्षास सरनोबतवाडी येथील भाड्याचे घर रिकामे करण्यास सांगितले होते.चार दिवसांपासून कसबा बावडा येथे आईकडे राहणारी समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू या दोघी घरातील साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून सरनोबतवाडी येथे गेल्या होत्या. साहित्याची आवराआवर करताना तिने सतीशला फोन केला. सुमारे १५ मिनिटांत पोहोचलेल्या सतीशने लग्नाचा आग्रह धरत समीक्षासोबत वाद घातला. मैत्रिणीने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. वाद विकोपाला जाताच सतीशने समीक्षाला चाकूने भोसकले. छातीत खोलवर जखम होताच समीक्षा चाकूसह कोसळली.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षाला लाथा मारून सतीश हॉलचे दार बाहेरून बंद करून निघून गेला. आयशू अंपले हिने अभिषेक सोनवणे या मित्राला फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर दोघांनी गंभीर जखमी अवस्थेतील समीक्षाला खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढे सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.कुटुंबाला धक्कासात वर्षांपूर्वी समीक्षाच्या वडिलांचे निधन झाले. तिची आई मासे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. अलीकडे समीक्षा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होती. तिच्या खुनामुळे कुटुंबाचा आधार हरपला असून, आई आणि भावंडांना मोठा धक्का बसला.

घटनास्थळी भयंकर दृष्यसमीक्षाच्या छातीत अडकलेला चाकू तसाच होता. घटनास्थळी हॉलपासून कीचनपर्यंत रक्त पडले होते. मैत्रीण आयशूने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही. खुनाची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. संबंधित घर शिवाजी पेठेतील एका पोलिसाचे असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.हल्लेखोराच्या शोधासाठी तीन पथकेघटनेनंतर पळालेला सतीश मोबाइल बंद करून लपला आहे. त्याच्या शोधासाठी गांधीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पथके रवाना झाली आहेत. उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, निरीक्षक रवींद्र कळमकर, अनिल तनपुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.क्लब चालवत असल्याने नकारसतीश यादव याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून, तो शिवाजी पेठेत क्लब चालवतो. त्याला दुसरे काहीतरी काम कर, असा सल्ला समीक्षाने दिला होता. परंतु, तो ऐकत नसल्याने तिने लग्नास नकार दिला. याच वादातून तिचा बळी गेल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

लिव्ह इनमधील दुसरी दुर्घटनालिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मित्राच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने १५ दिवसांपूर्वी आरकेनगर येथे आत्महत्या केली होती. १५ दिवसांत दुसऱ्या घटनेत सरनोबतवाडी येथे समीक्षा नरसिंगे या तरुणीला जीव गमवावा लागला. लिव्ह इनमधील दुसरी दुर्घटना घडल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मनस्तापच जास्तसंशयित सतीश यादव हा गावाकडे फारसा नसतो. घरी आई व भाऊ आहे. तो काय करतो, कुठे राहतो याची फारशी माहिती कुटुंबीयांनाही नाही. तो अविवाहित आहे. त्याच्या कृत्याचा आतापर्यंत घरच्यांना मनस्तापच जास्त झाल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस