शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनातील म्यूरल्सला मिळाली नवसंजीवनी

By संदीप आडनाईक | Updated: February 13, 2025 18:11 IST

शिल्पांवरील रंग उडून, छिद्रे पडल्यामुळे झाले होते विद्रुपीकरण

संदीप आडनाईककोल्हापूर : शाहू स्मारक भवनातील शाहू महाराजांच्या शिल्पांचे विद्रुपीकरण झाल्याचा मुद्दा सोशल मीडियावर तसेच खासदार शाहू छत्रपतींच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याची दखल घेतली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर एकाच दिवसात आदेश निघून या शिल्पाची रंगरंगोटी पूर्ण केल्याने या देखण्या शिल्पाला नवसंजीवनी मिळाली आहे.संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीनंतर शाहूनगरीत शाहू महाराजांनी उभ्या केलेल्या वास्तू आणि स्मारके जतन आणि संरक्षण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. एखादा पुतळा किंवा शिल्प उभारले की त्याच्या देखभालीकडे दुर्लक्षच होते असा अनुभव आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनाच्या दर्शनी भागात शाहूंचे कार्य दर्शवणारे कार्यशिल्प (म्यूरल्स) शिल्पकार अशोक सुतार यांनी तयार केले. काळाच्या ओघात धुळीमुळे ते विद्रुप झाले होते, तसेच त्यावरील रंगही उडून गेला होता. काही ठिकाणी त्याला छिद्रेही पडलेली होती.याबद्दल शाहूप्रेमींनी सातत्याने आणि वेळोवेळी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या शिल्पाचे विद्रुपीकरण होत असल्याचा मुद्दा शिव प्रबोधिनीचे विजय पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच खासदार शाहू छत्रपतींकडे मांडला. त्यानंतर तत्काळ आदेश निघून या शिल्पाची शिल्पकार अशोक सुतार यांनी रंगरंगाेटी केली. यासंदर्भात त्यांनी सुरुवातीला ९५ हजार रुपयांची निविदा भरली होती, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर ८५ हजार रुपयांत याची रंगरंगोटी पूर्ण करून त्याला नवसंजीवनी मिळाली आहे.फ्लेक्सची केली दुरुस्तीशाहूंचा पुतळा कोणाचे लक्ष जाऊ नये अशा ठिकाणी ठेवलेला आहे, आवारात शाहूंचे लावलेले फ्लेक्स खराब झालेले आहेत. या स्मारकाची अवस्था पाहून त्याबद्दल शाहूप्रेमींना प्रेम राहिले की नाही असा जाब विजय पाटील यांनी विचारला होता. हे फ्लेक्सही दुरुस्त करून पुन्हा योग्य जागी बसवण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर