शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका निवडणूक कडक निर्बंधांच्या कचाट्यात, काय आहेत निर्बंध? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 14:02 IST

उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचार पदयात्रा, घरोघरी प्रचार करण्यासह मतदान केंद्रातील व्यवस्था, मतमोजणीसंदर्भात स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसह राज्यातील अन्य महानगरपालिकेच्या नजीकच्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कडक निर्बंध घातले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचार पदयात्रा, घरोघरी प्रचार करण्यासह मतदान केंद्रातील व्यवस्था, मतमोजणीसंदर्भात स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत. ज्यांच्याकडून निर्बंधांचे उल्लंघन होईल, त्यांच्यावर कारवाईसुध्दा होणार आहे.महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याची तयारी पालिका प्रशासन तसेच राज्य निवडणूक आयोगाकडून जोरात तयारी सुरू आहे. पालिका प्रशासनाने प्रभागांचे प्रारूप आराखडे तयार करून आयोगास सादर केले आहेत. आता आयोगाकडून प्रारूप आराखडे जाहीर केले जाण्याची प्रतीक्षा आहे.एकीकडे प्रारूप आराखडे, आरक्षण प्रक्रिया कशाप्रकारे राबवायची यावर ठोस निर्णय होत असताना त्याही पुढे जाऊन आयोगाने प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यापासून मतमोजणी होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोणते नियम पाळायचे आहेत, कशाप्रकारे पाळायचे आहेत याचे सविस्तर पत्र महानगरपालिकेला पाठविले आहे.सर्वसाधारण नियम असे - निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्ती, कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे अनिवार्य आहे. 

- मतदान कक्षात काम करणाऱ्या सर्वांना दोन डोस घेणे आवश्यक. दोन डोस झाले नसतील तर ४८ तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक. 

- मतदान केंद्रात प्रवेश करणाऱ्यांचे तापमान तपासणार. मतदान केंद्रात सामाजिक अंतर राखणे आवश्यक. 

- शक्यतो मोठ्या हॉलमध्ये केंद्र सुरू करावीत. मतदान यंत्र हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्लोज आवश्यक.

नामनिर्देशन प्रक्रियाउमेदवारी अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. त्यानंतर त्याची प्रिंट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहेत. यावेळी दोन व्यक्तींनाच प्रवेश देणार. बहुसदस्य प्रभाग असल्यास एका केंद्रावर मतदार संख्या ७०० ते ८०० असणार, एक सदस्य प्रभाग असल्याच एक हजार मतदार संख्या असणार.मतदारांचा थर्मल स्कॅनिंग होणार. मास्क नसल्यास केंद्रातून देण्याची सोय. पॉझिटिव्ह रुग्णांना शेवटच्या एक तासात मतदानाची परवानगी. मतमोजणी केंद्रातही हीच नियमावली असेल.प्रचार कसा करायचा? -राजकीय पक्ष, उमेदवारांना प्रचार कसा करावा याचेही नियम केले आहेत. पहाटे पाच ते रात्री ११ जमावबंदी असल्याने पाच लोकांना येण्यास प्रतिबंध असेल.मोठ्या जागेत ५० लाेकांच्या उपस्थितीत सभा घेण्यासाठी परवानगी आवश्यक. पदयात्रा, घरोघरी प्रचार करताना पाचपेक्षा कमी लोकांना परवानगी. मतमोजणीनंतर मिरवणूक काढण्यास बंदी असेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक