शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महापालिकेचा बोंद्रेनगरातील बायोगॅस प्लँट यशस्वी

By admin | Updated: December 30, 2016 00:58 IST

झोपडपट्टीतील लोकांचा प्रतिसाद : प्रदूषणमुक्त, रोगराई कमी होण्यास मदत-- गुड न्यूज

कोल्हापूर : शहराच्या ज्या भागात ड्रेनेजलाईन नाही, त्या भागातल्या शौचालयातील मैलामिश्रीत सांडपाणी गटारीतून नाल्यात आणि नाल्याद्वारे थेट नदीत मिसळून पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढत आहे; परंतु त्यावर मात करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने शेल्टर असोसिएटस् या स्वंयसेवी संघटनेच्या (एनजीओ) माध्यमातून बोंद्रेनगर झोपडपट्टीत साकारलेला बायोगॅस प्लँट यशस्वी झाला असून झोपडपट्टीतील नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा प्लँट ‘पथदर्शी प्रकल्प’ ठरला आहे. या प्रकल्पाच्या यशस्वितेमुळे बोंद्रेनगर परिसरातील गटारी, नाल्यातून वाहणाऱ्या मैलामिश्रीत सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून त्यामुळे प्रदूषण तसेच रोगराई कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिकेने १९ लाख रुपये तर शेल्टर असोसिएटस्ने जवळपास १५ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. बोंद्रेनगर परिसरात छोटी झोपडपट्टी आहे तेथील नागरिकांच्या सोयीस्तव महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालयदेखील बांधले आहे; परंतु त्या भागात ड्रेनेज लाईन नसल्याने शौचालयातील सर्व सांडपाणी थेट गटारीत, छोट्या नाल्यात मिसळत होते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव होत होता. ‘स्वच्छ भारत अभियान’ संपूर्ण देशभर राबविले जात असताना महानगरपालिकेने ‘घर तेथे शौचालय’ योजना राबविण्यास सुरुवात केली. बोंद्रनगर झोपडपट्टीत एकाही झोपडीत वैयक्तिक शौचालय नव्हते. त्यामुळेच बायोगॅस प्लँटसाठी या झोपडपट्टीची निवड करण्यात आली. प्रकल्पातंर्गत झोपडपट्टीतील ६६ झोपड्यांमध्ये वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत. ‘शेल्टर’ संस्थेने सर्व झोपड्यांतील शौचालयांना टाईल्ससह सर्वप्रकारचे साहित्य पुरविले आहे तर महानगरपालिकेने शंभर मीटर परिसरात ड्रेनेज लाईन टाकून त्या शौचालयांना जोडली आहे. या झोपड्या कमी जागेत असल्याने त्यांना सेफ्टिंग टॅँक दिले तरी ते बसविणे अशक्य होते. त्यामुळे सर्व शौचालये थेट प्लॅँटला जोडली आहेत शिवाय २० बाय ३० आकाराचा एक बायोगॅस प्लॅँट तयार केला आहे. सर्व झोपड्यांतील मैलामिश्रीत सांडपाणी या प्लॅँटमध्ये जमा होते. प्लॅँटमधील तयार होणारा गॅस घरगुती वापराकरीता तीन कुुटुंबांना देण्यात आला आहे. त्याच्या मोबदल्यात ही कुटुंबे प्लँटची देखभाल करतात. सांगलीच्या शिवसदन या संस्थेने या प्लँटच्या दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली आहे. (प्रतिनिधी)बायोगॅस प्लॅँटमुळे प्रदूषण रोखण्यास मदत झाली आहे. प्लॅँटमध्ये मैलामिश्रीत सांडपाण्याव्यतिरिक्त जनावरांचे शेण टाकण्यात येते. तयार होणाऱ्या गॅसचा कसलाही वास येत नाही. झोपडपट्टीतील नागरिकांच्या सहकार्यामुळे प्लॅँट यशस्वी झाला. शहराच्या अन्य भागांत अशाप्रकारच्या प्लॅँटसाठी मागणी आली तर त्याचा विचार करण्यात येईल. - डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, कोल्हापूर महानगरपालिका