शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील संभाजीनगर बसपोर्टला मनपाची एनओसी, उद्घाटनाला मुहूर्त कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:52 IST

वर्षभर एनओसीसाठी हेलपाटे, प्रवाशांना प्रतीक्षा

सचिन यादवकोल्हापूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचे बसस्थानक म्हणून संभाजीनगर बसस्थानक आहे. या बसपोर्टचे मेकओव्हरचे काम पूर्ण झाले आहे. गेले वर्षभर विभागीय कार्यालय इमारत भोगवटा प्रमाणपत्र दाखल्यासाठी (एनओसी) प्रयत्न करत होते. हा दाखला २५ एप्रिल (शुक्रवारी) मिळाला आहे. त्यामुळे सर्व सुविधांनी सज्ज झालेले हे बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.राज्यातील १३ बसस्थानकांच्या यादीत संभाजीनगर बसस्थानकाचा नूतनीकरण आणि आधुनिकरणात समावेश होता. त्यानुसार एसटी प्रशासनाकडून काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एप्रिल २०२४ पासून एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून प्रयत्न सुरू होते. विभागीय अभियंता विभागाने त्यासाठी अनेक विभागांकडे प्रयत्न केले. अखेर एनओसी मिळाली आहे. त्यामुळे मे महिन्यात उद्घाटनाचा नारळ फोडून बसस्थानक सेवेत सज्ज करावे, अशी प्रवाशांतून मागणी होत आहे.

९ कोटी ८० लाखांचा खर्चमध्यवर्ती बसस्थानकातील कामकाजाचा भार कमी करण्यासाठी संभाजीनगर बसस्थानकाची नव्याने उभारणी झाली. हे बसस्थानक आधुनिक बसपोर्ट केले जात आहे. त्यासाठी ९.८ कोटींच्या निधीपैकी ८ कोटी ७३ लाखांचा खर्च केला तर उर्वरित कामासांठी अन्य निधी खर्च झाला आहे. रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. अंतर्गत रस्ते, विजेची व्यवस्था पूर्ण झाली आहे.

संभाजीनगर बसस्थानकमध्यवर्ती बसस्थानक आणि रंकाळा बसस्थानकाच्या जागेच्या तुलनेत संभाजीनगर बसस्थानकाचा परिसर १२ एकरांचा आहे. त्यात तीन एकरांत डेपो आहे. कोल्हापूर विभागाच्या ताफ्यात ७५० एस.टी. आहेत. रोज विविध मार्गावर तीन लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक आहे. संभाजीनगर आगारातून, रंकाळा बसस्थानकातून वाहतुकीचे नियोजन केले जाते.

प्रवासी वाहतूक कुठेसंभाजीनगर आगारातून कोकणासह गारगोटी, राधानगरी, गगनबावडा या तीन मोठ्या तालुक्यांत प्रवासी वाहतुकीला सुटसुटीत होणार आहे तर निपाणी, बेळगांव, हुबळीसह कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीला संधी आहे. कारण संभाजीनगरपासून पुणे-बंगळूर महामार्ग तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे.

दर्शनीभाग मॉलसाठीनवीन बसपोर्टचा दर्शनी भाग व्यापारासाठी दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात या भागाचे विस्तारीकरण होईल.

सुमारे वर्षभर एनओसीसाठी प्रयत्न सुरू होते. अखेर ती मिळाली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठविली आहे. त्यांच्याकडून पुढील सूचना मिळाल्यानंतर उदघाटनाची प्रकिया पूर्ण होईल. - सुरेश मोहिते, विभागीय अभियंता, एस.टी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर