शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

महापालिका : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी यंत्रणा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 12:09 IST

Muncipal Corporation CoronaVirus Kolhapurnews- कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. शहरात कोरोनाचे नियम भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी पथक तैनात केली आहेत. मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये जाऊन थेट कारवाई केली जात आहे. जनजागृतीसोबत कडक कारवाई, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्दे महापालिका : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी यंत्रणा लागली कामाला दंडात्मक कारवाईसाठी पाच पथके : तीन कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू होणार

कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. शहरात कोरोनाचे नियम भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी पथक तैनात केली आहेत. मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये जाऊन थेट कारवाई केली जात आहे. जनजागृतीसोबत कडक कारवाई, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोल्हापुरात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यासाठी अग्निशमन विभागाचे पथक नियुक्ती केले असून त्यांच्याकडून कारवाईची मोहीम सुरू आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी यासाठी जनजागृतीही केली जात आहे. केएमटीमध्ये मास्क नाही, प्रवेश नाही, मास्कचा वापर केला नाही तर दंड अशी स्टीकर लावली जाणार आहेत. मास्क वापर करत नसणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकात पोलिसांसह पाच कर्मचारी आहेत. सामाजिक संघटनेकडून जनजागृती केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार कोरोना केअर सेंटर सुरू करू.-निखिल मोेरे,उपायुक्त, महापालिका

पहिल्या टप्प्यात तीन कोरोना केअर सेंटर सुरू होणारजिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी किमान दोन कोरोना केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या महापालिकेच्या आयासोलेशन हॉस्पिटलमध्ये ७२ बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू आहे. राजोपाध्येनगर, कसबा बावडा पॅव्हेलियन आणि फुलेवाडी माने हॉल येथील कोरोना सेंटरमध्ये २०० बेडच्या क्षमतेची सर्व सुविधा उपलब्ध असून आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने हे सुरू केले जाणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर