शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
5
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
6
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
7
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
8
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
9
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
10
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
11
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
12
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
13
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
14
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
15
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
16
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
17
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
18
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
19
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
20
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!

मनपाच्या हॉस्पिटल्सची झाडाझडती

By admin | Updated: January 14, 2015 00:26 IST

‘स्थायी’च्या सदस्यांची मोहीम : गंभीर त्रुटींची दखल; आरोग्य यंत्रणेची यशस्वी शस्त्रक्रिया करू : फरास

कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, आयसोलेशन व पंचगंगा रुग्णालयांना आज, सोमवारी स्थायी समिती सभापती आदिल फरास व नगरसेवकांनी भेटी दिल्या. काही ठिकाणी आवश्यक मशिनरी, औषध साठा, इमारतीच्या दुरुस्तीची गरज असल्याचे मत फरास यांनी पाहणीनंतर सायंकाळी महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मात्र, कामचुकार कर्मचारी व आर्थिक साखळीत अडकलेले यंत्रणेतील ‘झारीतील शुक्राचार्यां’मुळेच आरोग्य यंत्रणेला अवकळा आली आहे. अखेरची घटका मोजत असलेल्या या आरोग्य यंत्रणेची यशस्वी शस्त्रक्रिया करून सक्षम करण्यास अग्रक्रम राहणार असल्याचे फरास यांनी यावेळी नमूद केले.मनपाची शहरातील मोठी महत्त्वाची तीन व प्रभागातील लहान १४ रुग्णालये अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्री व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना फरास यांनी भेटीदरम्यान दिल्या. यावेळी नगरसेवक सचिन चव्हाण, प्रकाश गवंडी, राजू हुंबे, शारंगधर देशमुख, संभाजी जाधव, इंद्रजित बोंद्रे, नगरसेविका संगीता देवेकर, ज्योत्स्ना मेढे, प्रभा टिपुगडे, माधुरी नकाते, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शहरातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञांना मनपाच्या रुग्णालयांत आठवड्यातून दोन दिवस मोफत सेवा देण्याबाबत विनंती केली आहे. अनेकांनी होकार कळविला आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली लवकरच याबाबत बैठक घेऊ. सुरक्षेच्या कारणास्तव सोडून गेलेल्या अकरा वैद्यकीय तज्ज्ञांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य यंत्रणेच्या आडवे येणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. अचानक भेटींचे सत्र सुरू ठेवून यंत्रणेला सजग ठेवण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी स्थायी सदस्यांचे पाठबळ आहेच, नगरसेवकांचेही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.- आदिल फरास,स्थायी समिती सभापती पंचगंगा रुग्णालयतब्बल ३० लाख रुपये खर्चून पंचगंगा रुग्णालयाचा कायापालट केला. मात्र, डॉक्टर्सच्या कमतरतेमुळे रुग्णालयात फक्त दोनच रुग्ण आढळले. पिण्याच्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्याने रुग्णालयामध्ये पाणीटंचाई आहे. सोलर यंत्रणेतही बिघाड झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे असलेल्या रुग्णालयात रुग्णांची वर्दळ वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.आयसोलेशन रुग्णालयशहरापासून लांब व निर्जन ठिकाणी असल्याने रुग्णालयास भुरट्या चोरांचा मोठा त्रास होत आहे. कर्मचारी व वैद्यकीय तज्ज्ञांची कमतरता आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या रुग्णांना प्रवेश नाकारला जातो. दारे मोडकळीस आली आहेत. सुरक्षा रक्षक नेमून परिसरातील अवैध वावर रोखण्याचे प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत.सावित्रीबाई फुले रुग्णालयनगरसेवक ांच्या भेटीमुळे पाहणी केल्याने मनपाची सुस्तावलेली आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. रुग्णालयात सर्वांत अधिक भोंगळ कारभार असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टर्स वेळेवर कामावर येत नाहीत. वॉर्डबॉयची नेमणूक असलेला एक्स रे मशीन चालवितो. कर्मचारी संघटनेच्या धाकाने अनेकजण फक्त मस्टरवर सही करून पगार लाटतात. दवाखान्याच्या इमारतीला गेल्या २५ वर्षांत रंग लागलेला नाही. सदस्यांसमोर कर्मचाऱ्यांनी तक्रार करू नये यासाठी दोन दिवसांपासूनच फिल्डिंग लावण्यात आली होती. सदस्यांनी काही कर्मचाऱ्यांशी बंद खोलीत चर्चा करून दवाखान्याची माहिती घेतली. आर्थिक साखळीगर्भवती महिलांसाठी थॉयरॉईडची चाचणी गरजेची नसते. मात्र, निव्वळ कमिशनसाठी थॉयरॉईडसह इतर सोनोग्राफी चाचण्या रुग्णांवर लादल्या जातात. या चाचण्यांतून मिळणाऱ्या कमिशनचा धनादेश आगाऊ दिला जातो. यंत्रणेत मोठी आर्थिक साखळी अडकलेली आहे. कमिशनपोटी हे सर्व केले जात असल्याने प्रत्येक आठवड्यात ओळखीचे रुग्ण पाठवून यंत्रणेवर लक्ष ठेवणार असल्याचे फरास यांनी स्पष्ट केले.रुग्णालयातील प्रयोगशाळा, सोनोग्राफी मशिनरी, एक्सरे मशीन आदींसह शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साम्रगीची दुरुस्ती व नव्याने खरेदी करावी लागणार आहे. रुग्णालयांकडे तब्बल १२००हून अधिक कर्मचारी आहेत. ही सर्व यंत्रणा उपलब्ध असूनही आरोग्य सेवेची जाण नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे भेटीदरम्यान नगरसेवकांच्या ध्यानात आले.